चंद्रपुरात 11 ते 14 एप्रिल दरम्यान बहुजन समता पर्वाचे आयोजन, राजकीय पुढाऱ्यासह, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार (Bahujan Samata Parva will be organized in Chandrapur from April 11 to 14, along with political leaders, administrative officers will be guided.)
चंद्रपूर :- ११ एप्रिल सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीबा फुले आणि १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३ या कालावधीत न्याय व समताधिष्ठित संविधानिक मूल्य रुजावित तसेच भारतीयत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी या उदात्त हेतूने बहुजन समता पर्वाचे आयोजन बहुजन मेडिकोज असोसिएशन तर्फे रोज सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत न्यू इंग्लिश हायस्कूलचे क्रीडांगण, वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे. ११ एप्रिल २०२३ रोजी म. फुले यांच्या जयंतीनिमित्त माळी युवा मंच, क्षत्रिय समाज व माळी समाज महिला मंडळ, चंद्रपुरच्या वतीने सकाळी ८ वाजता महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथून समता रॅली निघणार आहे. ११ एप्रिल २०२३ सायंकाळी ६ वाजता बहुजन समता पर्वाचे उद्घाटन माजी उर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते होणार असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेप्रोस्कोपी-किडनी तज्ज्ञ तथा बहुजन समता पर्वाचे अध्यक्ष डॉ. संजय घाटे हे राहणार आहेत. बहुजन समता पर्वाचे स्वागताध्यक्ष काशी सी.टी. स्कॅन व एम. आय. आर. तज्ज्ञ तथा फुले, शाहू आंबेडकरी ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. दिलीप कांबळे हे आहेत. प्रसिद्ध वक्ते कन्हैय्याकुमार (दिल्ली) यांचे ‘महात्मा फुले का गुलामगिरी ग्रंथ और आज का भारत‘ या विषयावर, माजी मंत्री, दिल्ली व आंबेडकरी नेते राजेंद्र पाल गौतम यांचे ‘बहुजन समाज और आज का राजकारण’ या विषयावर तर औरंगाबादचे प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे यांचे ‘सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीबा फुले’ या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन आयोजित केले आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी, कार्यकारी संचालक महानिर्मिती तथा मुख्य अभियंता सी.एस.टी.पी.एस., चंद्रपूर पंकज सपाटे, मुख्य वन संरक्षक, गडचिरोली किशोर मानकर (आय.एफ.एस.), निवासी जिल्हाधिकारी, चंद्रपूर विशाल मेश्राम, अधिक्षक अभियंता महावितरण, चंद्रपूर संध्या चिवडे इत्यादी मान्यवर अतिथी या समारंभास उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध क्षेत्रीतील मान्यवरही कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमास प्रसिद्ध नाटककार व कलावंत संजय जीवने यांचे महात्मा जोतीबा फुले यांच्या जीवनावरील एकपात्री नाटक सादर होणार आहे.
बुधवार १२ एप्रिल २०२३ ला सायं. ५ ते ६ वाजेपर्यंत चंद्रपूर आयडल २०२३ थी द्वितीय फेरी संपन्न होणार आहे. सायं. ६ ते १० वाजेपर्यंत प्रसिद्ध वक्त्या तथा फुले, शाहू, आंबेडकरी विचारवंत सुषमाताई अंधारे यांचे ‘संविधानापूर्वी आणि संविधानानंतर भारतीय महिलांचे वास्तव (हिंदू कोड बिल संदर्भात)’, सुप्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक, हिंगोली यांचे शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक व आदर्श बहुजन राजा’ या विषयावर तर ओबीसी आंबेडकरी विचारवंत मा. जी. करुणानिधी (तामिलनाडू) यांचे ‘ओबीसींची वर्तमानातील वाटचाल’ या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन होणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन समता पर्याचे सचिव कोमल खोबरागडे हे राहणार आहेत. डी.जी. पोलीस, नागालँड मा. संदिप सामगाडगे (आय.पी.एस.) हे प्रमुख अतिथी असून प्रतिष्ठित मान्यवर यांचीही उपस्थिती लाभणार आहे. गुरुवार दि. १३ एप्रिल २०२३ रोजी सायं. ५ ते ६ वाजेपर्यंत चंद्रपूर आयडलची उपान्त्य फेरी होणार आहे. माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा बहुजन नेते जितेंद्र आव्हाड हे ‘वर्तमान काळातील बहुजन समाजाची दशा आणि दिशा‘ या विषयावर, ओबीसी आंबेडकरी विचारवंत (दिल्ली विश्वविद्यालय) डॉ. लक्ष्मण यादव हे ‘फुले, शाहू, आंबेडकर आणि आजचा ओबीसी समाज, मंडल कमिशन व ओबीसींची जनगणना‘ या विषयावर प्रबोधन करणार आहेत. माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा बहुजन नेते छगन भुजबळ, डी. आय. जी. DIG पोलीस दिव अँड दमन मिलिंद डुबेरे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात शाहिरी जलसा ‘जागर समतेचा’ हा कार्यक्रम के.विद्या आणि सी.बी.एल.सी. बिजनेस ग्रुप, चंद्रपूर तर्फे सादर करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाश समिती, महाराष्ट्र शासन सदस्य प्रा. डॉ. कमलाकर पायस (अमरावती) हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची समकालीनता’ या विषयावर तर संस्थापक अध्यक्ष ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र इंजि. प्रदीप ढोबळे (मुंबई) हे ‘कलम ३४० ओबीसी आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मुख्य सचिव उद्योग, उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन डॉ. हर्षदीप कांबळे माजी जिल्हाधिकारी, चंद्रपूर तथा सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र राज्य मा. विजय वाघमारे व अधिक्षक अभियंता महावितरण, वर्धा अशोक सावंत हे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर इंडियन आयडल फेम सायली कांबळे आणि संच (ऑर्केस्ट्रा) Indian Idol fame Sayali Kamble यांचा हिंदी-मराठी सिने गीते तथा बुद्ध भीम गीतांचा आकर्षक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या भव्य कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती राहून आपला सहभाग दर्शवावा असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा मुख्य संयोजक डॉ. दिलीप कांबळे, अध्यक्ष तथा मुख्य संयोजक डॉ. संजय घाटे, कार्याध्यक्ष डॉ. इसादास भडके, कोषाध्यक्ष डॉ. राजू शेंडे, व सचिव कोमल खोबरागडे व उपाध्यक्ष डॉ. अमित ढवस, माजी नगरसेवक नंदू नगरगर यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments