तेलंगणा राज्याच्या नवीन सचिवालय (मंत्रालय) चे नामकरण डॉ.बी.आर.आंबेडकर सचिवालय तेलंगणा राज्य) व त्याच परिसरात उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 175 फुटाच्या पुतळ्याचे अनावरण 14 एप्रिल रोजी होणार..! (The new Secretariat (Ministry) of Telangana State will be named Dr.BR Ambedkar Secretariat Telangana State) and the 175 feet statue of Dr.Babasaheb Ambedkar erected in the same area will be unveiled on April 14..!)

Vidyanshnewslive
By -
0

हैद्राबाद - 14 एप्रिल रोजी   तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट (पायथा इमारत सह 175 फुट) उंच पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. हा जगभरातील आंबेडकरांच्या पुतळ्यांपैकी हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. हा पुतळा हैदराबाद शहराच्या मध्यभागी असलेल्या हुसेन सागर तलावाजवळ व नवीन सचिवालय परिसरात ( Dr Ambedkar statue hussain sagar ) बांधला आहे. बाबासाहेबां चा हा पुतळा 50 फुटांच्या कठड्यावर बसविण्यात आला आहे. एकूण उंची 175 फुट असून हा पुतळा 45 फूट रुंद आहे. सुमारे 11 एकर जागा पर्यटनासाठी विकसित - पुतळ्याच्या कामात नऊ टन कांस्य आणि १५५ टन स्टेनलेस स्टीलचा वापर केला आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर पुतळ्याभोवती सुमारे 11 एकर जागा पर्यटनासाठी विकसित केली जाणार आहे. ते केवळ तेलंगणातील लोकांसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असणार आहे. याशिवाय डॉ.आंबेडकरांचे जीवन व कार्य येथे संग्रहालय, छायाचित्र गॅलरी आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याजवळ ध्यान केंद्र आणि सभामंडपही बांधण्यात येणार आहे. पुतळ्याजवळ विकसित होत असलेल्या पर्यटन स्थळामध्ये स्वच्छतागृह, कॅन्टीन आणि पार्किंग अशा सर्व सुविधा असणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे डॉ. आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व स्तरातील लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहेत. डॉ.आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा उभारणे हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न होते. अनावरण- 14 एप्रिल 2023 रोजी डॉ. आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने या दिवशी उदघाट्न होणार आहे. भारतातील सर्वाधिक उंच क्रमांक 4 चा पुतळा आहे तसेच जगातील सर्वाधिक उंच क्रमांक 40 चा पुतळा असल्याची नोंद आहे.. 

सपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज ), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)