महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 14 एप्रिलला चंद्रपूर जिल्ह्यात मद्यविक्री बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश On the occasion of Mahaman Dr. Babasaheb Ambedkar Jayanti, sale of liquor in Chandrapur district on April 14, ordered by the District Collector.
चंद्रपूर :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील ईतर तालुक्यात 14 एप्रिलला मद्य विक्री बंद ठेवण्यात यावी या अनुषन्गाणे भीम आर्मी व अन्य आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी मद्य विक्री बंद ठेवावी यासाठी निवेदन देण्यात आले होते या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या द्वारे दिनांक 12 एप्रिल 2023 च्या आदेशान्व्ये वा परिपत्रकानुसार आदेश क्रमांक : सीएलआर/एफएलआर ११२०२३/८२०/व. लिपीक चंद्रपुर दिनांक १२८४/२०२३ चंद्रपुर जिल्हयांत दिनांक १४/४/२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठया प्रमाणात साजरा होणार आहे. सदर दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून चंद्रपुर जिल्हयांतील सर्व किरकोळ व घाउक मदय विक्रीच्या अनुज्ञप्त्या मदय विक्रीकरीता बंद ठेवणे आवश्यक आहे. करीता मी जिल्हाधिकारी, चंद्रपुर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन, चंद्रपुर जिल्हयातील सर्व घाउक व किरकोळ मदय विक्रीच्या अनुज्ञप्त्या (एफएल-१, एफएल-२,सीएल/एफएल/टिओडी-३, एफएल/बिआर-२, एफएल-३, सीएल-२,सीएल-३) दिनांक १४/०४/२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सवानिमित्त संपूर्ण दिवस बंद ठेवण्यांचे आदेश देत आहे. करीता वर नमुद तारखेस सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात बंदच्या कालावधीत अनुज्ञाप्ती मदय विक्रीसाठी उघडी ठेवु नये. तसे आढळून आल्यास संबंधीत अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारका विरुद्ध कडक कारवाई करण्यांत येईल याची नोंद घ्यावी. अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments