2024 ची निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक, त्यानंतर देशात हुकूमशाही वाढेल - प्रा. सुषमा अंधारे (2024 election may be the last election, then dictatorship will grow in the country - Prof. Sushma Andhare)

Vidyanshnewslive
By -
0

2024 ची निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक,  त्यानंतर देशात हुकूमशाही वाढेल - प्रा. सुषमा अंधारे (2024 election may be the last election, then dictatorship will grow in the country - Prof.  Sushma Andhare)

चंद्रपूर :- चंद्रपुरात 11 एप्रिल ते 14 एप्रिल या पुरोगामी विचारवंतांच्या जयंतीच्या निमित्तानं बहुजन समता पर्वाच आयोजन करण्यात आलेलं आहे या बहुजन समता पर्वाच उदघाटन दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारातील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या हस्ते झालं तदनंतर बहुजन समता पर्वाच्या दुसऱ्या दिवशी काल 12 एप्रिलला प्रा. सुषमा अंधारे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होत या व्याख्यानात आपले विचार मांडताना प्रा. सुषमा अंधारे म्हणालात की " या देशातील सरकारने लोकशाही ची चौकट मोडकडीस आणली असून या देशातील न्यायमूर्तींना सुध्दा आपल्यावर झालेला अन्याय मांडण्यासाठी प्रसार माध्यमापुढं यावं लागत या देशात सद्यस्थितीत खाजगीकरनाला पेव फुटले असून शासकीय नौकऱ्यावर गदा आणली जात असून यामुळे घटनेनं दिलेलं आरक्षण हे सरकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पुरोगामी विचारांच्या या देशात जाती धर्माच्या नावावर विष पेरलं जात आहे. या देशातील लोकशाही पद्धतीचे भारतासोबतच जगभरात दाखले दिले जात असतांना या देशातील लोकशाही वा संसदीय पद्धती धोक्यात आलेली आहे. पुढे बोलतांना प्रा. सुषमा अंधारे म्हणाल्यात की, मीं फार गांभीऱ्याने म्हणतेय की 2024 ची होणारी निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक आहे त्यानंतर या देशात हुकूमशाही पद्धती अस्तित्वात येइल ही शंका नाकारता येत नाही सद्यस्थितीत या देशातील लोकशाही पध्दतीने निवडून आलेली राज्य सरकार सुनियोजित रीतीने पाडली जात आहे. प्रसंगी खोके देऊन विकत घेण्याचा वा ईडी, सीबीआय चा धाक दाखवून विरोधी पक्षाला लक्ष्य केल जात आहे या देशातील लोकशाही पद्धतीची चौकट वा प्रकर्षाने भारताचं संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत या देशात लोकशाही वादी विचारप्रणाली वर विश्वास असणाऱ्या व्यक्तींचा पुरोगामी विचारांचा स्विकार करावा असे मत प्रा.सुषमा अंधारे यांनी बहुजन समता पर्वात व्यक्त केले.





संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)