स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग विसरता येणार नाही स्वा. सावरकर चौकाच्या नामकरण फलकाचा अनावरण सोहळा प्रसंगी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार (Freedom hero Savarkar's sacrifice cannot be forgotten. On the occasion of the unveiling ceremony of the naming plaque of Savarkar Chowk, No. Mr. Tribute to Sudhir Mungantiwar)
चंद्रपूर -: भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कित्येकांनी बलीदान दिले. असंख्य स्वातंत्र्यसेनानी या लढ्यात उतरले. यापैकी अनेकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेरणास्थान होते. सावरकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या स्वातंत्र्याचाच विचार केला आणि त्यासाठीच ते लढले. त्यांचे योगदान आणि त्याग कधीही विसरता येणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या नामकरण फलक अनावरण प्रसंगी ते बोलत होते.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोटूवार, रवींद्र गुरनुले, प्रकाश धारणे, अनिल फुलझले, संदिप आवारी, राहुल घोटेकर, शीलाताई चव्हाण, माया उइके,विठ्ठल डुकरे, चंद्रकला सोयाम, अजय सरकार, पुष्पा उराडे, महेंद्र जुमडे, सुनील डोंगरे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, राजेंद्र खांडेकर, सुरज पेदुलवार, संजय निखारे, चंदन पाल, चाँद सय्यद, आकाश ठुसे, प्रमोद शास्त्रकार, मनोज पोतराजे, सत्यम गाणार, राजेश यादव, सुरज सिंग, नूतन मेश्राम, प्रवीण गुरमवार, रुद्रनारायण तिवारी, रामकुमार अक्कापलीवार रणजीत डवरे मनीषा महातव, प्रभा गुडदे, प्रशांत विघ्नेश्वर, धनराज कोवे, सारिका सादुरकर, वंदना संतोषवार, प्रलय सरकार , संदीप देशपांडे , रितेश वर्मा , आशिष ताजने , बंडू गौरकार, सुशांत शर्मा, पवन ढवळे ,सागर भगत,महेश राऊत,शुभम गेडाम, सुनिता मुरस्कार, देवतळे, संदीप सदभैया, प्रदीप अलुरवार, आकाश मस्की, प्रवीण उरकुडे, सुशांत आकेवार अमोल मते,भक्त भडके, अक्षय शेंडे व आदी उपस्थित होत ना.श्री.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, जगात असंख्य स्वातंत्र्य लढे झाले. कित्येकांचे बलीदान गेले. पण तरीही संपूर्ण जगात केवळ विनायक दामोदर सावरकर यांनाच स्वातंत्र्यवीर असे संबोधले जाते, असे गौरवोद्गारही ना. मुनगंटीवार यांनी काढले. ते पुढे म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशासाठी त्याग आणि बलिदान अमूल्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समाजनिर्मितीसाठी आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठीही कार्य केले. समाजसुधारणेवर त्यांनी भर दिला.’ ‘ब्रिटीशांचा प्रचंड छळ सहन केल्यानंतरही त्यांच्या मनात एकच भावना होती, ती म्हणजे देश स्वतंत्र झाला पाहिजे. अशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सावरकरांचे बलिदान विसरून चालणार नाही,’ याचाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जुन उल्लेख केला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments