आजपासून चंद्रपुरात माता महाकालीची यात्रा सुरु, महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदी झाली इकॉर्निया मुक्त (Yatra of Mata Mahakali begins in Chandrapur from today, Jharpat river becomes icornia free in the background of Mahakali yatra)
चंद्रपूर :- चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकालीची यात्रा सोमवार चैत्र शुद्ध षष्ठी आजपासून सुरू होत आहे. यासाठी विदर्भ, मराठरावाडा, तेलंगणातील भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहेत. येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, महापालिका तसेच महाकाली मंदिर व्यवस्थापनाने संपूर्ण तयारी केली आहे. सोमवारी सकाळी ५ वाजता देवीला स्नान अभिषेक त्यानंतर वस्त्र परिधान करून दागिने घालण्यात येणार आहे. त्यानंतर महापूजा, घटस्थापनेनंतर मंदिर भाविकांसाठी सुरू होणार आहे. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक सुनील नामदेव महाकाले यांच्या हस्ते देवीची पूजा केली जाणार आहे. भक्तांच्या निवासाकरिता मंदिराच्या आतील परिसरात शेड तयार करण्यात आले आहेत. शिवाय, मंडप टाकण्यात आला. ही यात्रा जवळपास पुढील महिनाभर चालणार आहे. यात्रेमध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन तसेच महाकाली देवस्थान काळजी घेत आहे. विशेष म्हणजे या कार्यासाठी जवळपास 90 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल केला असून, मंदिर परिसरात पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. 'भक्तांच्या रांगेकरिता सहा हजार फूटांचा शेड तयार आहे. रांगेत उभे राहताना त्रास होऊ नये, यासाठी रेलिंग, पिण्याचे पाणी व पंख्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बैलबाजार परिसरातही भक्तांसाठी निवास कक्ष तयार करण्यात आला. परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरापेट्या जागोजागी ठेवण्यात आल्या आहे. शिवाय ईतर राज्य व जिल्ह्यातून माता महाकालीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी झरपट नदीचे पात्र इकॉर्निया मुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे "महाकाली यात्रा महिन्याभरावर व झरपट नदीचं पात्र इकॉर्निया वनस्पतीने वेढलेलं " या संदर्भात विद्यांश न्यूज सह ईतर प्रसार माध्यमांनी वृत्त प्रकाशित केल होत त्यामुळं प्रशासनाने भाविकांची होणारी अडचण लक्षात घेता युद्ध स्तरावर आपले कर्मचारी लावून झरपट नदीचं पात्र इकॉर्निया मुक्त करून भाविकांच्या स्नान साठी सोय उपलब्ध करून दिली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments