बल्लारपुरातील व्यंकटेश एम्पायर मधील चोरीच्या इराद्याने घुसलेल्या चोरांनी दुकानाला आग लावल्याचा अंदाज, दुकान पूर्णतः जळून खाक (Thieves entering Venkatesh Empire in Ballarpur with the intention of stealing allegedly set fire to the shop, the shop was completely gutted.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपुरातील व्यंकटेश एम्पायर मधील चोरीच्या इराद्याने घुसलेल्या चोरांनी दुकानाला आग लावल्याचा अंदाज, दुकान पूर्णतः जळून खाक (Thieves entering Venkatesh Empire in Ballarpur with the intention of stealing allegedly set fire to the shop, the shop was completely gutted.)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील मुख्य मार्गावरील  नवीन बस स्थानकच्या लगत असलेल्या व्यंकटेश एम्पायर मधील महाकाली फॅन्सी गिफ्ट अँड लेडीज कॉर्नरला आग लागून पूर्ण दुकान जळून खाक झाले असल्याची घटना पहाटे चार वाजताच्या दरम्यान काही अज्ञात लोकांनी पाहिली असता त्यांनी या घटनेची माहीती पोलीसाना कळवले पोलीसानी नगर परिषदेच्या सहकार्यातून दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणली दिवस निघाल्या नंतर दुकान पाहिले असता दुकान हे पूर्णतः जळून खाक झाले होते. आणि लगतच्या दुकानाचे शटर चे ताले तोडून शटर वर करून होते यावरून असे दिसून येते की चोरांनी शटर तोडून आत शिरले व चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र काही नगद रक्कम न मिळाल्याने आग लावली असावी असे अंदाज व्यक्त केल्या जात आहे, पोलीस आग कशी लागली याचा शोध घेत आहे. बल्लारपूर शहरात काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण खूप वाढले असून कोळसा चोरी, भंगार चोरी, गाडी चोरी, पेट्रोल चोरी घरफोडी, दुकान फोडी काही दिवसा अगोदर मेन रोड वरती एकाच दिवशी चार-पाच दुकान चे टाळे तोळण्यात आले होते या शिवाय श्री मंगल कार्यालय लगत असलेलं वाघमारे किराणा दुकानातून चोरी झाली होती. या सर्व बाबींचा विचार करता पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)