डॉ. विद्याधर बन्सोड यांची कथा सामाजिक जाणिवेची आहे - डॉ. बी.डी. चव्हाण (Dr. Vidyadhar Bansod's story is of social consciousness - Dr. B.D. Chavan)

Vidyanshnewslive
By -
0

डॉ. विद्याधर बन्सोड यांची कथा सामाजिक जाणिवेची आहे - डॉ. बी.डी. चव्हाण (Dr.  Vidyadhar Bansod's story is of social consciousness - Dr.  B.D.  Chavan)

बल्लारपूर :- व्यक्ती आणि समाज यांचे अतूट नाते आहे. लेखक समाजात राहतो. तो त्या प्रवाहाबरोबर वाहत असतो. म्हणूनच साहित्याच्या जाणीवा व प्रेरणा सामाजिक असतात. डॉ. विद्याधर बन्सोड यांची कथा ही सामाजिक जाणिवेची आहे. त्यामुळे त्यांच्या कथांना सामाजिक आशय प्राप्त झालेला आहे. समाजाने पिळल्या गेलेल्या, नाडल्या गेलेल्या माणसांचे वर्णन त्यांनी कथेतून केलेले आहे असे प्रतिपादन बल्लारपूर येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयातील प्रा. डॉ. बी. डी. चव्हाण यांनी केले. आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी, चंद्रपूर आयोजित डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या  साहित्यावरील चर्चासत्रात प्रमुख भाष्यकार म्हणून ते बोलत होते.  चर्चासत्राचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. लखनसिंह कटरे होते. त्यांनी बन्सोड यांचे साहित्य प्रेरणादायी आहे व ते  झाडीबोलीतुन  लिहिले गेले असल्यामुळे  या बोलीचा विकास होत असल्याचे सांगितले.  मंचावर डॉ. ज्योती पायघन, डॉ. प्रमोद नारायणे, श्री. किशोर जामदार, डॉ. इसादास भडके, डॉ. विद्याधर बन्सोड,  डॉ. अरुण लाडे होते. त्यांनीही बन्सोड यांच्या कादंबरी व ललित लेखनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. इसादास भडके यांनी केले. संचालन डॉ. संजय लाटेलवर यांनी तर आभार डॉ. मृदुला रायपूरे यांनी मानले. कार्यक्रमाला रसिक - श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)