अन अयोध्येतील राम मंदिरासाठी लागणाऱ्या काष्ठपुजन सोहळ्यासाठी बल्लारपूर नगरी सजू लागली, बल्लारपुरातील वनविभागाच्या भिंती वृक्षांच्या चित्रांनी बहरल्या (Ballarpur city started decorating for the Kashtapujan ceremony for the Ram Temple in Ayodhya, the walls of the forest department in Ballarpur were decorated with pictures of trees and works of art.)

Vidyanshnewslive
By -
0

अन अयोध्येतील राम मंदिरासाठी लागणाऱ्या काष्ठपुजन सोहळ्यासाठी बल्लारपूर नगरी सजू लागली, बल्लारपुरातील वनविभागाच्या भिंती वृक्षांच्या चित्रांनी बहरल्या (Ballarpur city started decorating for the Kashtapujan ceremony for the Ram Temple in Ayodhya, the walls of the forest department in Ballarpur were decorated with pictures of trees and works of art.)

बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान लाकूड हे देशात सर्वोत्तम आहे. या सागवान काष्ठचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी उपयोग करण्यात येणार आहे. चंद्रपूरहून श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठीचे सागवान काष्ठ हे विधिवत पूजन करून भव्य शोभायात्रेने वाजत गाजत रवाना करण्यात येणार आहे. ही शोभायात्रा दोन भागांत होणार आहे. २९ मार्च रोजी बल्लारपूर येथे दुपारी साडेतीन वाजता काष्ठ पूजन आणि आरती होऊन सायंकाळी चार वाजता पहिल्या शोभायात्रेची सुरुवात होईल. चंद्रपूर येथे महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा निघेल. जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून सागवानचे हे लाकूड बुधवारी (ता. २९) विधीवत पूजा करून शोभायात्रेद्वारे अयोध्येकडे रवाना होणार आहे. सागवान काष्ठाचा पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वने, सांस्कृतिक कार्यमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट २०२० रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. तेव्हापासून श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. सुमारे एक हजार वर्षे श्रीराम मंदिराची वास्तू टिकावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे. मंदिराचे महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, इतर दरवाजे यासाठी सागवान लाकडाची गरज आहे. मंदिर निर्माण समितीने वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली होती. मुनगंटीवारांनी या विषयात व्यक्तिश लक्ष घालत सर्वोत्तम दर्जाचे सागवान अयोध्येला पाठविण्याकरिता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. श्रीराममंदिराच्या महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे. निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील डेहराडून येथे असलेल्या फॉरेस्ट रिसर्च इस्टिट्यूटशी संपर्क साधला असता त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगितले. त्यामुळे चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन अण्ड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाले. यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला माहिती मिळताच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी यासंदर्भात वनमंत्री मुनगंटीवार यांना तातडीने पत्र पाठवत या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे. सागवानचे हे काष्ठ मुनगंटीवार यांनी आपल्या हस्ते अयोध्येकडे प्रस्थान करावे, अशी विशेष विनंतीही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी पत्रात केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)