योग नृत्य परिवार व संविधान जागर समितीच्या वतीने संविधान जागर प्रबोधन कार्यक्रम संपन्न (On behalf of Yoga Nritya Parivar and Constituent Jagar Committee, the Constituent Jagar Awareness Program was concluded)
चंद्रपूर :- योग नृत्य परिवार आणि संविधान जागर समिती तर्फे आज आझाद गार्डन योग नृत्य परिवार परिवारात संविधान जागर प्रभोधन कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात संविधान जागर चे मा.अशोकजी घोटेकर आणि प्रा. व्हेलेकर सर उपस्थित होते. सुरवातीला दोन्ही पाहुण्यांचे स्वागत केंद्र प्रमुख संतोषजी पिंपळकर आणि धनंजय तावाडे यांनी पुषगुच्छ देऊन केले. यानंतर सर्वांनी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले. प्रास्ताविक अशोकजी घोटेकर यांनी तर संविधानातील धर्मनिरपेक्ष मुल्यावर प्रकाश टाकला तर प्रा. व्हेलेकर यांनी मार्गदर्शन करतांना भारतीय संविधानात असलेली स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या तत्वाच पालन केल्यास देश निश्चितच प्रगती करेल. या कार्यक्रमाचं संचालन व आभार धनंजय तावाडे यांनी केले. कार्यक्रमाला योग नृत्य परिवार आझाद गार्डन ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments