मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आता 28 मार्च रोजी, 12130 हावडा - पुणे व 22846 हातिया-पुणे 25 व 26 मार्च रोजी नागपूर बल्लारशाह मार्ग धावण्याची शक्यता ? Central Railway megablock now on March 28, 12130 Howrah - Pune and 22846 Hatia-Pune on March 25 and 26 Nagpur Ballarshah route likely to run?

Vidyanshnewslive
By -
0

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आता    28 मार्च रोजी, 12130 हावडा - पुणे व 22846 हातिया-पुणे 25 व 26 मार्च रोजी नागपूर बल्लारशाह मार्ग धावण्याची शक्यता ? Central Railway megablock now on March 28, 12130 Howrah - Pune and 22846 Hatia-Pune on March 25 and 26 Nagpur Ballarshah route likely to run?

नागपूर :- दुहेरी मार्ग यार्डच्या रीमोल्डिंग आणि एनई कामामुळे 22 व 23 मार्च रोजी सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागातील बेलापूर, चितळी, पुणतांबा ब्लॉक घेण्यात येणार होता, मात्र तो आता पुढे ढकलण्यात आला असून 28 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून दहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत तर चार गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नांदेडहून सुटणारी गाडी क्रमांक 12630 नांदेड-पुणे एक्सप्रेस 26 व 27 रोजी रद्द करण्यात आली आहे. 17629 पुणे-नांदेड एक्स्प्रेस 27 रोजी व 28 रोजी परतीच्या प्रवासात रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 26 व 27 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 11040 गोंदिया-कोल्हापूर-महाराष्ट्र एक्सप्रेस 28 व 29 रोजी रद्द करण्यात आली आहे. 01136 दौंड-भुसावळ मेमू 27 व 30 मार्च रोजी रद्द करण्यात आला आहे तर 01135 भुसावळ-दौंड मेमू 27 व 30 मार्च रोजी रद्द करण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक 12114 नागपूर-पुणे एक्सप्रेस 26 रोजी तर 12113 पुणे-नागपूर एक्स्प्रेस 27 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. 12136 नागपूर-पुणे एक्स्प्रेस 27 मार्च रोजी नागपूरहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे तर 12135 पुणे-नागपूर एक्स्प्रेस 28 रोजी पुण्याहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. 

         12627 बंगलोर-नवी दिल्ली ही बेंगळुरूहून 26 व 27 रोजी सुटणारी गाडी पुणे-लोणावळा-वसई रोड-वडोदरा-रतलाम-संत हिरडाराम नगरमार्गे जाई तर 12221 पुणे-हावडा 27 रोजी पुणे-लोणावळा-पनवेल-कल्याण-मनमाडमार्गे चालवण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक 12147 कोल्हापूर-निजामुद्दीन 27 रोजी कोल्हापूरहून सुटेल आणि पुणे-लोणावळा-पनवेल-कल्याण-मनमाड-मार्गे जाईल. तर गाडी क्रमांक 12130 हावडा-पुणे- 25 व 26 रोजी नागपूर -बल्हारशाह-सिकंदराबाद-वाडी दौंड-पुणे मार्गे जाईल. गाडी क्रमांक 20658 निजामुद्दीन-हुबळी 26 रोजी निजामुद्दीनहून सुटेल. संत- हिरडाराम नगर-रतलाम-वडोदरा-वसई रोड-पनवेल-लोणावळा-पुणे मार्गे ती चालवण्यात येणार आहे तर ट्रेन क्रमांक 11078 जम्मूतवी-पुणे - झेलत एक्स्प्रेस पुण्याहून 27 रोजी निघेल व जम्मूतावी-संत हिरडाराम नगर-रतलाम-वडोदरा-वसई रोड-पनवेल-लोणावळा-पुणे मार्गे धावणार आहे. गाडी क्रमांक 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को ही गाडी 26 व 27 रोजी मनमाड-वली मनमाड-इगतपुरी-पनवेल लोणावळा-पुणे मार्गे जाईल. 12628 दिल्ली-बेंगलोर गाडी 26 व 27 रोजी संत हिरडाराम नगर-रतलाम-वडोदरा-वसई रोड-पनवेल-लोणावळा-पुणे मार्गे जाईल. ट्रेन क्रमांक 22846 हातिया-पुणे एक्स्प्रेस 26 रोजी नागपूर-बल्हारशाह-सिकंदराबाद-वाडी दौंड-पुणे मार्गे जाईल. गाडी क्रमांक 12150 दानापूर-पुणे एक्स्प्रेस 26 व 27 रोजी दानापूरहून सुटल्यानंतर मनमाड-इगतपुरी-पनवेल-लोणावळा मार्गे धावणार आहे. 4 गाड्यांच्या वेळेत बदल गाडी क्रमांक 02131 पुणे-जबलपूर गाडी 20 व 27 रोजी दुपारी 3.25 वाजता सुटेल तर 12103 पुणे-लखनौ 21 व 28 रोजी दुपारी 3.25 वाजता सुटेल 22845 पुणे-हातिया 26 रोजी दुपारी 3.25 वाजता सुटेल तर 15030 पुणे-गोरखपूर 18 व 25 रोजी दुपारी 3.25 वाजता सुटेल. प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)