राज्यातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधनात वाढ, या संदर्भात शासन परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहीती (Information that a government circular has been issued in this regard regarding the increase in remuneration of professors on hourly basis in the state)
वृत्तसेवा :- तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेरीस पूर्ण झाली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. त्याचा सरकार आदेश आज जारी करण्यात आला. उद्योग व व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित केलेल्या तज्ज्ञांसाठीचे मानधन ७५० रुपयांवरून १५०० रुपये करण्यात आले आहे. प्रात्यक्षिकासाठी ७५० रुपये ठेवण्यात आले आहे. कला शाखा पदवी, पदव्युत्तर, पदविका अभ्यासक्रमासाठी ९०० रुपये प्रतितास कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अध्यापनासाठी प्रतितास ९०० रुपये, प्रात्यक्षिकासाठी ३५० रुपये, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १००० रुपये तर शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणसाठी १००० रुपये, विधी अभ्यासक्रमासाठी १००० रुपये, प्रशिक्षित कनिष्ठ अधिव्याख्यातांचे मानधन ३०० रुपये तर अप्रशिक्षित कनिष्ठ अधिव्याख्यातांचे मानधन २५० रुपये करण्यात आले आहे. ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांची २२३ पदे भरणार राज्य सरकारने ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालकांची पदे भरण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी लावण्यात आलेले निर्बंधही उठविण्यात आले आहेत. यामुळे येत्या काळात ही २२३ पदे भरली जाणार असल्याची माहीती आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments