महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न, मतदार नोंदणी संदर्भात मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले (In Mahatma Jyotiba Phule College, the voter awareness program was completed and the dignitaries were given guidance regarding voter registration)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आज 28 मार्च 2023 ला मतदार जनजागृती कार्यक्रम पार पडला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमान सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणुन मा. सतीश साळवे, नायब तहसीलदार, बल्लारपूर, मा. राजेंद्र शेंडे, ना.त. बल्लारपूर, मा. कल्याणी पटवर्धन, प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय बल्लारपूर, प्रा. रोशन फुलकर, रा.से.यो विभाग, प्रा. बोबडे सर, अर्थशास्त्र विभाग ई ची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर अतिथींच्या स्वागतानी झाली. तदनंतर मार्गदर्शन करतांना मा. सतीश साळवे सर, नायब तहसीलदार म्हणालेत की, शाळा महाविद्यालय ही लोक शिक्षणाची प्रभावी माध्यम असून यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या लोकशाही प्रकियेत तत्परतेने सहभाग घ्यावा याकरिता वर्षाची 18 वर्षे पुर्ण झालेल्या वा 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जूलै व 1 ऑक्टोम्बर रोजीच्या अहर्ता दिनांकावर 18 वर्षे पुर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवावे याकरिता प्रत्येक मतदार नमुना 6 फॉर्म भरावा तसेच सदर फॉर्म भरतांना फॉर्म हा अचूक पध्दतीने भरावा. या फॉर्म सोबत स्वतःचे आधार कार्ड व पालकाच्या मतदान कार्डची सत्यप्रत जोडावी जेणेकरून मतदान यादीत नाव येताना इतरत्र जाणार नाही वा संबंधित मतदाराला मतदानापासून वंचित राहता येणार नाही. याशिवाय आपण सर्व विद्यार्थीमित्रांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आपल्या परिसरातील मतदानास पात्र असणाऱ्या व्यक्तीस ही कळवावे असे आवाहन मान्यवर अतिथींनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रोशन फुलकर यांनी केले तर संचालन प्रा.मोहनीश माकोडे व आभार प्रदर्शन प्रा. बोबडे सरांनी केले या कार्यक्रमाला प्रा. डॉ.विनय कवाडे, प्रा. पल्लवी जुनघरे मॅडम, प्रा. सतीश कर्णासे, प्रा. साखरे सर, प्रा. दिपक भगत, प्रा. बि.डी.चव्हाण सर, प्रा. योगेश टेकाडे, प्रा. पंकज कावरे सर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मित्रांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक -: दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments