सम्राट अशोक, भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध, चार्ल्स एलन लिखित पुस्तकाचा डॉ. धनंजय चव्हाण यानी केलेला मराठी अनुवाद ()Emperor Ashoka, In Search of India's Lost Emperor, by Charles Allen, Marathi translation by Dr. Dhananjay Chavan)
वृत्तसेवा :- प्राचीन भारतीय इतिहास संशोधनातील , बौद्ध आणि जैन धर्माचा उदय व प्रसार, मगध साम्राज्य, सिकंदर चे आक्रमण, मौर्य साम्राज्याची स्थापना, चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आजच्या अफगानिस्तान पासून कर्नाटक पर्यन्त विस्तीर्ण अश्या भूभागावार साम्राज्य निर्माण करण्यापासुन या साम्राज्यातिल जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवन्याचे कार्य या सम्राटानी केले. एवढा चक्रवर्ती सम्राट असूनही, भारताच्या काना कोपऱ्यात शिलालेख, स्तम्भलेख उभारुनही सम्राटअशोक भारतीय इतिहासात एकोनिसाव्या शतका पर्यन्त विस्मृतित होता. या हरवलेल्या सम्राटाचा शोध कसा लागला किंवा कश्या प्रकारे लागत गेला यांची रंजक माहिती या पुस्तकातुन मिळते .
हे पुस्तक आपणास इंग्रजकाल, मौर्य काल आणि वर्तमानकाल ( आणि थोड़े फार फिरोजशाह तुगलक याचा काल ) या तीन काळाच्या प्रवासावर नेते, भारताच्या राष्ट्रध्वजा वरील अशोक चक्र आणि देशाची राजमुद्रा सम्राट अशोकाशी आपले अतूट नाते दर्शवते आणि आपल्या संविधानातील धर्मनिरपेक्षता आणि मध्यवर्ती सरकारचे प्राबल्य ही तत्वे सम्राट अशोकाच्या शासन व्यवस्थेतुन आलेली दिसतात हे पुस्तक आपल्याला सम्राट अशोकाची शोधकथा सांगते, या शोधकथेत आपल्याला अनेक प्राचीन नायकाची भेट घालून देते त्यात सिकंदर (अलेक्जांडर ) चंद्रगुप्त, चाणक्य , पुरु, हर्षवर्धन, सातवाहन आणि गुप्त सम्राट येतात यांच्या सोबत आपण ग्रीस , इजिप्त, सप्तसिंधु सोबत भारतीय उपखंडाच्या चारही कोपऱ्यापर्यन्त भ्रमण करुण येतो. या काळातील लिखित इतिहास उपलब्ध नसल्याने आणि भारतीय संस्कृति बद्दल जाणून घेण्याची अत्यंत उत्कंठा असणारे हौशी आणि अभ्यासु प्राच्यविद्या संशोधक त्यांनी कुतूहलातून शोधलेले शिलालेख आणि स्तम्भलेख, संस्कृत चा अभ्यास करुण पुराणातुन शोधूलेला इतिहास आणि या संदर्भात ग्रीक , चीन , भूटान व इतर ऐतिहासिक सन्दर्भन्शी केलेली पडताळनी ही एखाद्या डॉक्यूमेंट्री प्रमाणे आपल्यासमोर या पुस्तकाच्या माध्यमातून येते, यातून आपल्याला मेगेस्थानिज, फाहियान, हुएं त्सांग, टॉलेमी व इतरांची प्राचीन प्रवासवर्णने यातील संदर्भ व त्यांच्या या शोधातिल योगदान ची माहिती मिळते
प्राचीन भारताचा इतिहास संशोधनात प्राच्यविद्या संशोधक यांचे योगदान , त्यांच्या हातून झालेल्या चुका आकस्मिक लागलेले शोध, कोलकाता येथील रॉयल एशियाटिक सोसाइटी चे योगदान आणि तेथे श्रेय प्राप्ति साठी काही इंग्रजांनी केलेले राजकारण त्यातून संशोधनाची झालेली हाणी या अनेक बाबी समोर येतात. इंग्रज इतिहास संशोधकाची चिकाटी , संशोधन पद्धति प्रशासक म्हणून कार्य करता करता दिलेले योगदान त्याना भारतीय संशोकानी दिलेली साथ ही माहिती येते यातून लार्ड कनिंघम , होरेस हेमन विल्सन, जेम्स प्रिंसेप, ब्रायन हॉजसन, सर अलेक्जांडर यांच्या कार्याची माहिती मिळते आणि भारतीय पुरातत्व खात्याची निर्मिती यातून कशी होत गेली याची सुद्धा माहिती मिळते. या सर्व संशोधनामधे विस्मृतित गेलेली ब्राम्ही लिपि, आणि तीचा अर्थ उलगडन्यात जेम्स प्रिंसेप ला मिळालेले यश ही घटना एक नवी दिशा देते, भारतीय शिलालेख मधे उल्लेख असलेला राजा पियदस्सी हाच सम्राट अशोक होता या रहस्याचा झालेला उलगड़ा अनेक कोड़ी सोड़वतो सोबतच ग्रीक आणि चीनी प्रवासींची नी लिहलेली प्रवास वर्णने यांच्या इतिहासाची , भारतीय इतिहास आणि घटना सोबत घेतलेला पडताळा संशोधनाची पुष्टि करतात. पहिला चंद्रगुप्त मौर्य हा ग्रीक इतिहासात क़ाय नावाने येतो, ही माहिती सुद्धा रोचक आहे. या सर्व संशोधनातुन प्राचीन भारतीय समृद्ध विचार आणि तत्त्वे ही पुढे आली आणि भारत भूमि जंगली किंवा राणटी लोकांची नसून जगाला ज्ञान देणारी विचारांची भूमि असल्याचे सिद्ध झाले.
बौद्ध धर्माचा भारतातील उदय, आणि अशोकाच्या प्रयत्नाने या धर्माचा प्रसार सम्पूर्ण आशिया खंडात कसा होत गेला यांची माहिती मिळते. या समृद्ध इतिहासाचा भारतीय विचारवंतावर सकारात्मक परिणाम होवून त्याची परिणति डॉ. बाबासाहेब आम्बेडकर आणि पंडित नेहरूनी भारतीय संविधानात आणलेली सर्वसमावेशकता यात दिसून येते. सोबतच सम्राट अशोक यांचे दूसरे नाव प्रियदर्शिनी हे नाव पंडित नेहरूनी इन्दिराजीना देण्यात सम्राट अशोक बद्दल चा आदरभाव दाखवून देतो. एकन्दरित इतिहास अभ्यासक आणि भारतीय संस्कृति अभ्यासका साठी एक उत्तम पुस्तक.वाचनातून मानवी वर्तनाबद्दलचे काही प्रश्न उद्भवतात ?
1)भारतीय उपखंडाचा चक्रवर्ती सम्राट विस्मृतित जाण्या मागे क़ाय कारणे असावित ?
2) अहिंसा, सहनशीलता, शांति ही मूल्ये जपत असताना राणटीपणा, कपटिपणा लोभिव्रुत्ति यांच्याशी सामना कसा करावा? आणि त्याना वरचढ़ होण्यापासून कसे रोखावे ?
3)भगवान बुद्ध आणि सम्राट अशोक यानी जनतेला उपदेश करीत धर्माकडे वळवले परंतु काही शतकानंतर हा मार्ग जनतेच्या विस्मृतित का गेला?
4) नागरिकांणी विशिष्ट मुल्ये आणि तत्व यांचेशी ठाम राहावे आणि याविरुद्ध वागणाऱ्याना बाजूला करावे याकरिता क़ाय होने आवश्यक आहे?
सर्व वाचना दरम्यान आपल्याकड़े पुरातन वारश्याबाबत असलेली अनास्था यानी त्यातून किती महत्त्वाचे पुरावे आपण नष्ट करीत असतो यांची पुसटशी कल्पना सुद्धा नष्ट करणाऱ्याला नसते. या बद्दल संताप जागृत होतो.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments