अयोध्येतील राममंदिरातील काष्ठपुजनाच्या निमित्तानं बल्लारपुरात भक्तिमय वातावरण ; वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते काष्ठपुजन सोहळा संपन्न, महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ विशेष आकर्षण (Devotional atmosphere in Ballarpur on the occasion of Kashtapujana in Ram Mandir in Ayodhya; Forest Minister Sudhirbhau Mungantiwar completed the Kashtha Pujan ceremony, Chitrarath of Maharashtra State became a special attraction.)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- नवी दिल्लीतील नवीन संसद भवन अर्थात (सेंट्रल विस्टा) साठी बल्लारपूर च्या वनविभागातील व आल्लापल्लीच्या जंगलातील उच्च प्रतीच्या लाकडाच्या वापरानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या वापरासाठी सुध्दा लार्सन अँड टुब्रो कंपनीने बल्लारपुरातील चिरान या उच्च प्रतीच्या लाकडाची शिफारस केली व वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून आज 29 मार्च 2023 ला सायंकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते बल्लारपुरातील जगप्रसिद्ध असलेल्या मोठे लाकूड व काष्ठपुजन सोहळ्याची पूजा करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी मा. विनय गौडा, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा. रिना जनबंधू, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. सपना मुनगंटीवार, मा. चंदनसिह चंदेल, माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ, मा. हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, मा. मंगेश गुलवाडे ई ची उपस्थिती होती. 

       या रॅलीच विशेष आकर्षण महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ ठरला असून वन्य प्राण्याचा देखावा नागरिकांचं लक्ष वेधून घेत होता ज्यात हत्ती, पोपट, अस्वल, कोंबळ ई प्राणी लक्ष वेधत होते या निमित्तानं आदिवासी संस्कृतीची झलक म्हणुन गोंडी नृत्य, ढोल ताशा पथकं विशेष म्हणजे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर तेलंगाना, कर्नाटक, गोवा व आध्रपदेशातूनही कलावंत आले होते 45 प्रकारच्या विविध देखाव्याच्या माध्यमातून मिरवणुकीद्वारे काष्ठपुजन रॅली ही बल्लारपूर वनविभागाच्या एंट्रीगेट पासून सुरु झाली. वृत्त येईपर्यंत सदर रॅली चंद्रपुरातील महाकाली मंदिरात वंदन करून क्लब ग्राउंडवर समारोप होईल त्या ठिकाणी सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांचा भक्तीगीतांचा बहारद्वार कार्यक्रम संपन्न होणार आहे. या पूजे करिता तिरुपती बालाजी देवस्थानच्या माध्यमातून 15, 000 लाडू प्रसाद स्वरूपात वाटण्यात येइल विशेष म्हणजे बल्लारपूर शहरात होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील विविध मंदिर, गुरुद्वारा, रयतेचे राजे छत्रपती  शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून एकूण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)