आजपासून लालपरीत (एसटीत) महिलांना प्रवासात 50% सवलत, शासन परिपत्रक जारी झाले (50% discount on travel for women in Lalparit (STat) from today, government circular issued)

Vidyanshnewslive
By -
0

आजपासून लालपरीत (एसटीत) महिलांना प्रवासात 50% सवलत, शासन परिपत्रक जारी झाले (50% discount on travel for women in Lalparit (STat) from today, government circular issued)

मुंबई :- राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास (ST News) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. अखेर या आदेशाचा जीआर (GR) निघाला असून शुक्रवारपासून (17 मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)