अबब ! प्रेमात गर्लफ्रेंडने धोका दिल्यानंतरही प्रियकराला मिळाले 25 हजार रु ची रक्कम (Abba! Even after being threatened by his girlfriend in love, the boyfriend got Rs 25 thousand)
वृत्तसेवा :- कोणतेही नाते तुटल्यानंतर होणार दुःख आणि वेदना या सांगण्यासारख्या नसतात. जेव्हा आपण एखाद्यासोबत नातं जोडतो तेव्हा आपण भावनिकरीत्या त्याच्याशी किंवा तिच्याशी गुंतलेलो असतो, अशावेळी जर ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर आपल्याला खूप वेदना होतात. ब्रेकअपमुळे आपल्या शरीरावर आणि मनावर खूप मोठे परिणाम होतात. ब्रेकअप झाल्यामुळे स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो, आपल्याला कोणीतरी नाकारलं अशी भावना मनात निर्माण होते. तसेच आपण स्वतःला कमी लेखतो. पण तुम्ही कधी अशी कल्पना केली आहे का ब्रेकअकनंतर पैसे सुद्धा मिळत असतील? होय एका तरुणासोबत हे घडलं आहे. त्याच्या प्रेयसीच्या बेवफाईमुळे त्याला 25,000 रुपये मिळाले आहेत. ते कसे मिळाले याचा खुलासा त्याने त्याच्या ट्विटर अकाउंट वर केला आहे. प्रतिक आर्यन असं या तरुणाचे नाव असून तो आणि त्याची प्रेयसी प्रत्येक महिन्याला त्यांच्या जॉईंट अकाउंट वर 500 रुपये भरत होते. त्यांचा असा करार होता की ज्याची फसवणूक होईल त्याला "हार्टब्रेक इन्शुरन्स फंड" मध्ये जमा केलेले सर्व पैसे मिळतील. त्याने आपल्या ट्विटर वरून सांगितलं की आमचे रिलेशनशिप सुरू झाल्यावर आम्ही जॉईंट अकाउंटच्या माध्यमातून दर महिन्याला 500 रुपयांची गुंतवणूक सुरु करत एक पॉलिसी बनवली होती. आता माझ्या प्रेयसीने माझी फसवणूक केल्यामुळे मला 25000 रुपये मिळाले. आर्यनच्या या ट्विटला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. एका नेटकऱ्याने म्हंटल कि, मी सुद्धा गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत होतो. यातून उत्तम रिटर्न मिळत आहे असं दिसतंय. सहयोगासाठी कोणी तयार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments