बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आर.पि.एफ च्या तत्परतेने 2 मुलीची मुली चाईल्ड लाईन व वन स्टाफ सेंटरकडे सुपूर्द (At Ballarshah railway station, RPF promptly handed over 2 suspicious girls to Child Line and One Staff Centre.)
बल्लारपूर :- बल्लारपूर रेल्वे स्थानक हे एक महत्वाचं रेल्वे स्थानक असून मध्य रेल्वे, दक्षिण पुर्व रेल्वे व दक्षिण रेल्वे चे संगम म्हणूनही ओळखलं जात म्हणुन बल्लारपूर स्थानकावरील पोलीस दक्ष असतात अशाच एका प्रकरणात बल्लारशाह स्थानकावरील आर. पी. एफ. ने रेल्वे गाडीतून दोन अल्पवयीन प्रवासी मुलीला उतरवून त्यांना चाईल्ड लाईन व वन स्टाफ सेंटर कडे सुपूर्द केले. या संदर्भातील माहितीनुसार बल्लारपूर येथील रेल्वे पोलीसला १५ मार्च रोजी विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष नागपूर कडून सूचना आले की गाडी क्रमांक १२७९२ दानापुर सिकंदराबाद एक्स्प्रेस मध्ये दोन मुली संशयास्पदरित्या प्रवास करीत आहे. त्या सूचनेवरून आर. पी. एफचे सहाय्यक उपनिरीक्षक डी के गौतम, शिपाई विलास मडावी तसेच चाईल्ड लाईन बल्लारपूरचे सदस्य अतुल मडावी, अमूल्य मोरले व लक्ष्मण कोडापे यांनी सोबत गाडी मध्ये तपासणी केली असता पेंट्रिकारचे टी सी ने त्या दोन मुलीची माहिती देऊन त्यांना बल्लारशाह रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांची विचारपूस केली असता ते बिहार राज्यातील छपरा येथून हैद्राबादला आत्याच्या घरी काम शोधण्यासाठी जात असल्याची माहीती आहे. यातील नाबालिक मुलीच्या वडिलांना अर्धांगवायू असून घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. ती प्रौढ मुली सोबत हैद्राबाद जात होती. सदर दोन्ही मुली रा. गौरा जि. छपरा बिहार राज्य येथील असून एक १७ वर्ष व दुसरी मुलगी १८ वर्षाची आहे. या दोन्ही मुलीची वैद्यकीय तपासणी ग्रामीण रुग्णालयात करून त्यांना चाईल्ड लाईन बल्लारपूर व वन स्टाफ सेंटर कडे सुपूर्द करण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments