बल्लारशाह रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने १८ वर्षीय तरूणीला रेल्वे पोलिसांनी सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन, ऑपरेशन शोध V आणि दिशा उपक्रमांतर्गत कारवाई (Thanks to the prompt action of the Railway Police, an 18-year-old young woman was safely reunited with her parents; the operation was carried out under the 'Operation Shodh V' (Operation Search V) and 'Disha' initiatives.)
बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ वर मध्यरात्री एकटी बसलेल्या १८ वर्षीय तरूणीला रेल्वे पोलिसांनी सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन केले. ऑपरेशन शोध V आणि दिशा उपक्रमांतर्गत राबविण्यात येणान्या 'चिल्ड्रेन रीयुनिफिकेशन इनिशिएटिव्ह'च्या माध्यमातून रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत संभाव्य अनुचित घटना टाळली. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास बल्लारशाह रेल्वे पोलीस चौकीतील रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांना फलाट क्रमांक २ वर मानसी राजेश बंगले (वय १८ वर्षे, रा. मौलाना आझाद वांर्ड, बल्लारशा, जि, चंद्रपूर) ही तरूणी एकटी बसलेली दिसून आली. एवढ्या रात्री ती एकटीच असल्यांचे लक्षात येताच पोलिसांनी तिला चौकीत आणून विचारपूस केली. तेव्हा त्या तरुणीने कौंटुंबिक वादातून घर सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती होती विचारपूस केली असता, मानसीच्या आई-वडिलांचे निधन झाले असून ती आपल्या मोठ्या आईकडे राहत असल्याचे समोर आले. आदल्या दिवशी मोठ्या आईचा मुलासोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात ती घरातून निघली होती. त्यानंतर ती रेल्वे स्थानकावर आली होती.
रेल्वे पोलीस चौकी बल्लारशाह पोलिसांनी समजुती नंतर पोलिसांनी तिची समजूत घालत रात्रीच्या बेळी एकटीने घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते, असे समजावून सांगितले. तसेच तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुटुंबीयांना माहिती देणे आवश्यक असल्यांचे पटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी तरूणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तिची मोठी आई सुनीता मदन बंगले (वय ४४ वर्षे, रा. बल्लारशा) आणि शुभम यांना रात्री रेल्वे पोलीस चौकीत बोलावले. त्यांना तरूणीच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात आली. तसेच तिच्याशी प्रेमांने संवाद साधावा, तिला समजून घ्यावे आणि यापुढे अशा प्रकारे ती एकटी घराबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांच्या समजुतीनंतर मानसीने यापुढे घरातून एकटी निघून जाणार नसल्याचे सांगतले. तिने मोठ्या आई व भावासोबत घरी जाण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पोलिसांनी तिला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या ताब्यात देऊन घरी पाठविले. पोलिसांच्या तत्परतेचे कुटुंबीयांकडून कौतुक तरूणीला योग्य वेळी मदत करून सुरक्षितपणे घरी पोहोचविल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी रेल्वे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनुचित घटना टाळण्यास मदत झाली. मार्गदर्शनासाठी पोलिसांची कारवाई ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, नागपूर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी शेळके, अकोला यांच्या नेतृत्वाखाली तसेच रेल्वे पोलीस स्टेशन वधींचे पोलीस निरीक्षक विरसेन चंदादे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईत बल्लारशाह रेल्वे पोलीस चौकीतील पोलीस हवालदार रवींद्र खंडारे, पोलीस शिपाई राजेंद्र फटींग आणि पोलीस शिपाई अश्विन पनलेवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या