Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे! राज्यपालांचे आदेश (MPSC Chairman Vivek Bhimanwar goes on leave; Satish Waghole given additional charge of the MPSC Chairman post – orders issued by the Governor.)

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे! राज्यपालांचे आदेश (MPSC Chairman Vivek Bhimanwar goes on leave; Satish Waghole given additional charge of the MPSC Chairman post – orders issued by the Governor.)

वृत्तसेवा :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या प्रशासकीय पातळीवर मोठी आणि महत्त्वाची घडामोड घडली आहे. एमपीएससीचे विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार हे रजेवर गेले असून, त्यांच्या जागी आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडे एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत. एमपीएससी परीक्षांमधील पारदर्शकता, वेळेत निकाल आणि पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी तीव्र धरणे आंदोलन छेडले होते. विद्यार्थ्यांचा वाढता संताप आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित झालेले प्रश्न यामुळे आयोगाच्या कारभारावर प्रचंड टीका होत होती. या घडामोडींच्या दरम्यानच अध्यक्ष विवेक भीमनवार हे रजेवर गेल्याने आयोगाचे कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी राज्यपालांनी सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. वाघोले हे सप्टेंबर महिन्यातच एमपीएससीच्या सदस्यपदी दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांत एमपीएससीच्या प्रशासनात वेगाने मोठे बदल झाले आहेत. नुकतीच सचिवपदी आयएएस सौरभ कटियार यांची नियुक्ती झाली असून, आता अध्यक्षपदाचा कार्यभारही वाघोलेंकडे आला आहे. तसेच पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची समितीही गठीत करण्यात आली आहे. अशा नाजूक व आव्हानात्मक काळात लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करणे, प्रलंबित परीक्षांचे नियोजन वेळेत पूर्ण करणे आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता राखणे, हे मोठे आव्हान नवनियुक्त प्रभारी अध्यक्ष सतीश वाघोले यांच्यासमोर असणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या