Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

SIR गोंधळात भर, जुन्या मतदारांसाठी फॉर्म ६ बदला राज्य निवडणूक आयोगाची सूचना ! (More confusion: State Election Commission issues directive to change Form 6 for existing voters !)

SIR गोंधळात भर, जुन्या मतदारांसाठी फॉर्म ६ बदला राज्य निवडणूक आयोगाची सूचना ! (More confusion: State Election Commission issues directive to change Form 6 for existing voters !)

वृत्तसेवा :- एसआयआर मध्ये नाव वगळलेल्या मतदारांना अडचणी येत असल्याने फॉर्म ६ मध्ये बदल करून ‘नवीन मतदार’ हा उल्लेख हटविण्याची तसेच यापूर्वीच्या मतदार ओळखपत्राचा (ईपीआयसी) क्रमांक नमूद करण्याची मुभा देण्याची मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाकडे केली आहे. कायदा काय सांगतो ? लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार खोटी घोषणा केल्यास एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. खोटी प्रतिज्ञा/हमी द्यावी लागत आहे, मतदारांमध्ये गोंधळ आणि नाराजी महाराष्ट्रात झालेल्या एसआयआरमध्ये ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहेत, त्यांना पुन्हा नाव नोंदवण्यासाठी ‘फॉर्म ६’ भरावा लागत आहे. मात्र फॉर्म ६ हा प्रामुख्याने नवमतदारांसाठी असतो. त्यामुळे पूर्वीपासून मतदार असलेल्या नागरिकांनाही यामध्ये ‘मी पहिल्यांदाच मतदार म्हणून नोंदणी करत आहे’ अशी खोटी प्रतिज्ञा/हमी द्यावी लागत आहे. या तांत्रिक व कायदेशीर विसंगतीमुळे मतदारांमध्ये गोंधळ आणि नाराजी निर्माण होत असल्याने, फॉर्म ६ मध्ये तातडीने बदल करावा, अशी मागणी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोगाकडे केली. मतदारांना अडचण काय ? सध्या फॉर्म ६ हा प्रामुख्याने नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरला जातो. या अर्जातील घोषणेनुसार, अर्जदाराने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रथमच अर्ज केला असून, त्याचे नाव अन्य कोणत्याही विधानसभा किंवा लोकसभा मतदार संघाच्या यादीत नाही, असे घोषित करावे लागते. मात्र, एसआयआरमध्ये नाव वगळले गेलेले अनेक नागरिक यापूर्वीच नोंदणीकृत मतदार होते. त्यामुळे त्यांनी हा अर्ज भरताना चुकीची घोषणा केल्यास कारवाई होऊ शकते, अशी भीती आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या