तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली, तर राज्यातील 12 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Tukaram Mundhe transferred again; 12 senior police officers in the state also transferred.)
विश्वास नांगरे पाटील नागपूर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती तर नागपूरचे विद्यमान पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती
मुंबई :- शिस्तप्रिय व कर्तव्य निष्ठ अधिकाऱ्यांना शासन प्रशासन काम करू देत नाही त्याचा फटका पुन्हा एकदा तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्यांना बसतोय. गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात भेसळी विरोधात कठोर मोहिम राबवून अनेकांना धडकी भरविणारे तुकाराम मुंडे यांची राज्य सरकारने महत्वाच्या पदावरुन उचलबांगडी केली आहे. मुंढे यांना महत्वाच्या पदावरुन हटविण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंडे यांनी अmन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सुरुवातीस आयुक्तपद हे कमी दर्जाचे असून सरकारने आपला अवमान केल्याचे सांगत या पदावर रुजू होण्यास मुंढे ना खूश होते. मात्र राज्य सरकारने त्यांची अन्य पदावर नियुक्तीची विनंती फेटाळल्यानंतर मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कारवाई सुरु केली आहे. मुंढे यांनी गेल्या पंधरा- वीस दिवसात भेसळीविरोधात धडक मोहिम राबविली असून अन्न, औषधे, दूध, खवा भेसळ करणाऱ्यांवर कठोर कावाईचा बडगा उगारत अनेकांना जेलमध्ये पाठविले आहे. एवढेच नव्हे तर काही मोठ्या कंपन्या, उद्योग, हाॅटेलवरही मुंढे यांनी कारवाई करीत आपल्या कामाची चूनूक दाखविली आहे. विशेष म्हणजे मुंढे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करीत त्यांची बदली करण्यासाठी काही नाराज मंडळी प्रयत्नशील असतानाच राज्य सरकारने मंगळवारी मुंढे यांना आणखी एक धक्का दिला. राज्य सरकारने प्रत्येक जिल्हयात प्रशासकीय सोयीसाठी पालक सचिवांची नियुक्ती केली आहे. जिल्हयात राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्याच्या साह्यासाठी तसेच जिल्हयातील प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक जिल्हयात एका सचिवाची पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात येते. या प्रथेनुसारच सरकारने तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असताना त्यांची परभणीचे पालक सचिव म्हणून नियुक्ती केली होती. मात्र मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आल्यानंतर मुंढे यांची आता परभणीच्या पालक सचिव पदावरुनही उचलबांगडी करण्यात आली आहे. तर मुंढे यांच्या जागी परभणीचे पालक सचिव म्हणून ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अकोला जिल्हा पालक सचिवपदी कृषी सचिव परिमल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं मंगळवारी पुन्हा एकदा पोलिस दलात मोठे फेरबदल केले आहेत. यावेळी राज्याच्या गृहविभागानं १२ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार, राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदावर कार्यरत असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूरचे विद्यमान पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांची अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महायुती सरकारच्या दुसर्या टर्ममध्ये प्रशासकीय पातळीवर मोठी उलथापालथ सुरू आहे.सातत्यानं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात येत आहे. प्रशासनातील वरिष्ठ आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका कायम ठेवल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात सत्तेत परतलेल्या महायुती सरकारच्या या बदल्यांच्या आदेशांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडताना दिसून येत आहे.
१. प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त छ. संभाजीनगर शहर यांची पोलीस उप आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई
२. निलभ रोहन पोलीस अधीक्षक, हिंगोली पोलीस अधीक्षक, नांदेड
३. अभिनाश कुमार पोलीस अधीक्षक, नांदेड पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
४. श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा पोलीस अधीक्षक, हिंगोली
५. रुपाली अंबुरे पोलीस उप आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई (बदली आदेशाधीन) पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
६. शशिकांत सातव पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर पोलीस उप आयुक्त, छ. संभाजीनगर शहर
७. रमेश धुमाळ पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर
८. पीयुष जगताप समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १७ चंद्रपुर अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा
९. नारायण शिरगांवकर समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ गडचिरोली समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १९ कुसळगांव, अहिल्यानगर
१०. प्रांजली सोनावणे पोलीस अधीक्षक, गुअवि, अमरावती पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या