Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

प्रेमसंबंधातून चंद्रपुरात हत्या, नागपुरातील हिंगण्यात दफन करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, आरोपी शहर पोलिसांच्या अटकेत (Murder in Chandrapur stemming from a romantic relationship; attempt made to destroy evidence by burying the body in Hingna, Nagpur—accused now in the custody of the city police.)

प्रेमसंबंधातून चंद्रपुरात हत्या, नागपुरातील हिंगण्यात दफन करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, आरोपी शहर पोलिसांच्या अटकेत (Murder in Chandrapur stemming from a romantic relationship; attempt made to destroy evidence by burying the body in Hingna, Nagpur—accused now in the custody of the city police.)

चंद्रपूर :- प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे पर्यवसान महिलेच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. ४५ वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे नेऊन पुरण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे संबंधित महिलेसोबत गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या संतोषने महिलेचा गळा दाबून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. हत्येनंतर गुन्हा उघडकीस येऊ नये आणि पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने त्याने महिलेचा मृतदेह हिंगणा येथे नेऊन पुरला. 
         दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी संतोष स्वतः चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. चंद्रपूर शहर पोलिसांचे पथक हिंगणा येथे पोहोचले. कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचनामा करून जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आल्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष साखरकर (४९, रा. तुकूम, चंद्रपूर) याला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक युवराज सहारे तसेच पोलीस हवालदार राकेश फुकट आणि पोलीस अंमलदार मोरेश्वर शिंदे, रोशन भोईंकर व लीना काठवले यांनी ही कारवाई केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या