Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, २८ वर्षीय तरुण ताब्यात ६.७३० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ४२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त (A swift operation by the Local Crime Branch has led to the detention of a 28-year-old man. Authorities seized 6.730 grams of MD drug powder, a mobile phone, and cash, with the total value of the confiscated items amounting to 42,310 rupees.)

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, २८ वर्षीय तरुण ताब्यात ६.७३० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ४२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त (A swift operation by the Local Crime Branch has led to the detention of a 28-year-old man. Authorities seized 6.730 grams of MD drug powder, a mobile phone, and cash, with the total value of the confiscated items amounting to 42,310 rupees.)

चंद्रपूर :- शहरात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एम.डी. मेफेड्रोन ड्रग्ज पावडरसह एका २८ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. शानवाज उर्फ शानू इस्माईल शेख २८ वर्षे रा. अहमदिया मस्जिदजवळ, रामाळा तलाव, चंद्रपूर असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. या कारवाईत ६.७३० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ४२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात नागपूरमधून अमली पदार्थ आणल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली असून, तस्करीच्या जाळ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रामाळा तलाव परिसरातील एक व्यक्ती एम.डी. ड्रग्ज पावडर विक्री करण्याच्या उद्देशाने जमनजेट्टी परिसरात येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हनुमान मंदिरासमोर, एम.ई.सी.बी. कार्यालयाजवळ सापळा रचला. पोलिसांनी ६.७३० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर, ज्याची किंमत २० हजार १९० रुपये आहे, ओप्पो ए-५ प्रो कंपनीचा जुना वापरता मोबाईल, किंमत २० हजार रुपये, तसेच दोन हजार १२० रुपये रोख असा एकूण ४२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
        मिळालेल्या वर्णनानुसार पांढऱ्या रंगाचा तपकिरी ठिपके असलेला पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि काळी पँट घातलेला संशयित तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. राजपत्रित अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या पँटच्या खिशात प्लास्टिकच्या पन्नीत पांढऱ्या रंगाची एम.डी. ड्रग्ज पावडर, मोबाईल फोन आणि रोख रक्कम आढळून आली. अमली पदार्थ तपासणी किटद्वारे तपासणी केल्यानंतर पावडर अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात संबंधित तरुणाने ड्रग्ज पावडर नागपूर येथून विक्रीसाठी आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ च्या कलम ८(क) आणि २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, अमली पदार्थांचा पुरवठा कोणामार्फत केला जात होता आणि या व्यवसायाचे जाळे किती विस्तृत आहे, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचारे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस अंमलदार सतीश अवथरे, लालू यादव, इनान खान, संदीप कांबळे, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजावर अली यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या