नागपूर :- रक्ताचा एक थेंबही न सांडता भगवान बुद्धांनंतर दुसऱ्यांदा झालेले वैश्विक धम्मचक्र प्रवर्तन. बोधिसत्व डॉ.बाबासाहेब कृत धम्मचक्र प्रवर्तन अमान्य करणारे लोकच, जाणून बुजून एक अपप्रचार करतात. १४ ऑक्टोंबर हाच दिवस कोणी अनुप्रवर्तन, कोणी धम्मक्रांती तर कोणी धम्मदीक्षा दिवस म्हणून साजरा करतात. हा शुद्ध दांभिकपणा आहे. बाबासाहेबांनी निर्माण केलेला मार्गपथ आधी तोडमोड करायचा. व नंतर त्यांनी केलेल्या सम्यक क्रांतीलाही नेस्तनाबूत करण्यासाठी विविध प्रकारे अजेंडा राबवून भ्रम पसरवयाचा!
परमपूज्य डॉ.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोंबर ही तारीख गृहीत धरली नसून, विजयादशमी हा दिवस गृहीत धरला होता. त्याचे कारण म्हणजे दसरा अर्थात विजयादशमीदिनीच सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्म प्रसाराचे कार्य हाती घेतले होते. तसेच काही विद्वानांच्या मते विजयादशमीचा दिवस म्हणजे, धम्मराज्य स्थापनेचा दिवस आहे. आणि आपण जर सर्रासपणे बाबासाहेबांचा दृष्टिकोन नाकारून १४ ऑक्टोंबर ही तारीख गृहीत धरून, धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करत असोत तर ही पूर्णपणे बाबासाहेबांच्या विचाराची प्रतारणा करत असून, त्यांच्या सम्यक परिवर्तनवादी दृष्टिकोनाला हरताळ फासत आहोत! त्यामुळे लक्षात घ्या! कोणी काहीही म्हणू, पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजेच विजयादशमी दिवस अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिवस.१४ ऑक्टोंबर १९५६, ही तारीख गृहीत नसून विजयादशमी ऑक्टोबर १९५६ हा दिवस गृहीत आहे! त्यामुळे यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा दिनांक २० ऑक्टोम्बर २०२६ रोजी असून, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी आहे स्वतः युगसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपादक असलेले व शेकाफेचे अधिकृत मुखपत्र प्रबुद्ध भारत यातील संपादकीय मजकूर व बातमीदाराची बातमी. सोबत दीक्षाविधीची निमंत्रण पत्रिका!
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या