विद्याश न्युज :- बहुतेक लोक बोलताना आढळतात की बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. पण ते अर्धसत्य आहे .किंवा चुकीचे आहे असे म्हटले तरी चालेल तर सत्य हे आहे की विज्ञान हे बौद्ध धम्म यावर आधारित आहे. कारण या विश्वाचे तथागत बुद्ध यांना जगाचे पहिले मनोवैज्ञानिक असे म्हटले आहे आणि ते जगाने मान्य देखील केले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ने गेल्या शंभर वर्षांत या जगात कोण महान होऊन गेले त्याचा जेव्हा इतिहास शोधला त्यात जगातील धम्म संस्थापक , शास्त्रज्ञ , डॉक्टर ,वकील घेतले आणि जगासमोर 100 महान लोकांची यादी प्रसिद्ध केली त्यात बुद्ध हे पहिल्या स्थानावर आहेत. साऱ्या जगाने मान्य केले.आणि त्या यादीत तिसरा क्रमांक सम्राट अशोक याचा आहे आणि चवथा क्रमांक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. विज्ञान या शब्दाचा अर्थ असा होतो वि म्हणजे विशिष्ट प्रकारचे ज्ञान म्हणजे विश्लेषण करून केलेले ज्ञान. आणि वि म्हणजे विश्वाचे ज्ञान .विज्ञानाच्या माध्यमातून आपण सत्य जाणण्याचा प्रयत्न करतो .ते सत्य आपण पंचद्रियाद्वारे जाणतो पहिले जे ज्ञानेंद्रिय आहे ते म्हणजे आपले डोळे त्याला चक्षुविज्ञान म्हणतो.त्या डोळ्याच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त होते. दुसरे आहे श्रोत विज्ञान . म्हणजे जे कान ज्या द्वारे आपण ऐकतो .तिसरे आहे Ghran विज्ञान नाकावाटे आपण श्वास घेतो. चांगला असतो वाईट ही असतो .जिव्हा विज्ञान या जिभेच्या माध्यमातून आपण चव घेतो गोड आहे की खारट आहे हे आपण समजतो.स्पर्श विज्ञान आपण आपल्या त्वचेच्या माध्यमातून स्पर्श करतो. थंड आहे की गरम आहे हे आपल्याला कळते .अशी ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत आणि या ज्ञानेंद्रियांना कंट्रोल करणारे आपले मन असते हे सहावे इंद्रिय आहे. या सहा इंद्रियांच्या माध्यमातून जी जाणीव होते त्याला वेदना असे म्हणतात ही वेदना सुखकारक असते तर कधी दुःख कारक असते तर कधी असुखकारक आणि अदुखकारक असते, अशा प्रकारे तीन वेदना आपल्याला जाणवतात त्या वेदनांना नावे देतो त्याला आपण संज्ञा म्हणतो. वेदना चांगली की वाईट अशी संज्ञा दिल्यानंतरच जी आपली प्रवृत्ती बनते तिला संस्कार म्हणतात.आणि या संस्कारातून माणूस घडतो अशा प्रकारे विज्ञानाची व्याख्या आहे.ही गोष्ट तथागत बुद्धांनी सांगितली आणि तीच आजच्या विज्ञानाने मान्य केली.
विज्ञानाच्या कसोट्या आपण पाहू या
1) पहिली कसोटी - म्हणजे कोणताही ग्रंथ , कोणताही माणूस सांगतो म्हणून नव्हे तर ती गोष्ट विज्ञानाद्वरे तपासली जाते त्याची सत्य , असत्यता पारखून घेतली जाते. तथागत बुद्धांनी कालाम सुत्तामध्ये कलामाना हेच सांगितले आहे.मी सांगतो म्हणून नव्हे . कोणत्या धर्मग्रंथात लिहिले
आहे म्हणून नव्हे तर हे तुमच्या बुद्धीला पटते का बघा , त्याची सत्यता तपासून पहा.हे 2556 वर्षांपूर्वी सांगितले.प्रत्येक गोष्टीचा स्वतः अनुभव घ्या आणि मग ठरवा सत्य काय आणि असत्य काय ? आणि जर तुम्हाला वाटले ही गोष्ट माझ्या हिताची आहे, माझ्या कुटुंबाच्या हिताचि व, लोकांच्या हिताची आहे तरच ती सत्य माना.
2) दुसरी कसोटी - विश्व हे विशिष्ठ नियमांनी बद्ध असून त्याचे ज्ञान प्रयोग ,पडताळा करून सिद्ध करता येते .त्यात ऋतू नियम आहेत पावसाळा , हिवाळा , उन्हाळा याप्रमाणे विश्व देखील विशिष्ठ नियमाने बद्ध आहे.हेच बुद्धाने सांगितले की कर्मानुसार सर्व गोष्टी होतात. आणि हे ज्ञान देखील प्रयोगाने सिद्ध झाले पाहिजे .
3) तिसरी कसोटी - कोणत्याही दृष्ट शक्तीच्या बळाने किंवा प्रार्थनेतून , यज्ञ करून विश्वाच्या कार्यकारण भावाच्या नियमात काहीही फरक पडत नाही. तथागत बुद्धांनी हीच गोष्ट प्रतीत्यसमुत्पाद या सिद्धांताच्या माध्यमातून 2500 वर्षांपूर्वी सांगितली आहे. प्रतीत्य समुत्पाद म्हणजे जेवढा प्रत्यय त्याच्या सम प्रमाणात उत्पाद होतो .यालाच कार्यकारण भाव असे म्हणतात म्हणजे कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही.जगात कोणत्याही प्रकारचा चमत्कार नाही सुप्त शक्ती नाही,
4) चवथी कसोटी - सर्वोच्च ज्ञान साक्षात्काराने , तपस्येने, अतिंद्रीय शक्तीने प्राप्त होत नसून ते बुद्धीच्या कसोटीतून , प्रयोगाने, सातत्याने प्राप्त होते. आणि हेच तथागतांनी सांगितले आहे.
5) पाचवी कसोटी - अज्ञेय म्हणजे अज्ञात शक्ती या जगात नाही. केवळ कृतीतूनच सिद्धता घडविता येते. कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही हेच तथागतांनी सांगितले आहे
6) सहावी कसोटी - रूढी , परंपरा, पूर्वग्रह , मत मतांतरे यांनी न जुमानता विज्ञान सर्वांसाठी खुले असते .ते सार्वजनिक असते, ते तपासता येते. आणि ते सर्वत्र जगभरात सारखे असते. तथागतांनी हेच सांगितले आहे आणि ते ही 2500 हजर वर्षांपूर्वी. भगवान बुद्ध यांचा धम्म देखील सर्वांसाठी खुला आहे.हा धम्म देखील सार्वजनिक आहे, जर आपण त्याचे अनुसरण केले तर सर्वांना समान लाभ होऊ शकतो. तथागत म्हणतात ,, एहिपसक्को ओपनयीको म्हणजे या आणी पहा तपासा जर योग्य वाटले तर स्वीकार करा.
7)सातवी कसोटी - विज्ञान सदा सर्वदा नम्र असते बुद्धाच्या धम्मात देखील माणूस धम्माचे अनुसरण कायेने , वाचेने मनाने करेल तेवढा तो नम्र होतो आणि विनयशील होतो. त्याप्रमाणे विज्ञान हेदेखील नम्र असते .
8) आठवी कसोटी - विज्ञान कधीही अंतिम सत्याचा दावा करीत नाही. हा अंतिम निर्णय आहे असे विज्ञान कधीच सांगत नाही बुद्ध ही हेच सांगतात मी सांगतो ते खरे आहे असे नाही. ते खरे की खोटे ते तुम्ही तपासा, आणि अनुभवाने ठरवा सत्य काय असत्य काय. तथागतांनी सांगितले आहे की कालानुरुप तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता. मी सांगतो म्हणून तुम्ही स्वीकारू नका कोणी दुसरे सांगतो म्हणून ते ही स्वीकारू नका जे तुम्हाला योग्य वाटते. जे कल्याणकारी आहे असे वाटले तरच स्वीकार करा. प्रत्येक गोष्ट तपासा त्याचे निरीक्षण करा आणि तरच स्वीकारा .ही जी माणसाला विचार करायला लावणारी त्याला बुद्धिवादी बनविणे ही संकल्पना बुद्धांनी मांडली आणि तीच विज्ञानाने स्वीकारली. बुद्ध म्हणतात माझा धम्म हा माझा शोध आहे. त्यात बदल होऊ शकतो. काळानुसार बदल होऊ शकतो. हे माझे अंतिम सत्य नव्हे. मला सोडलेले सत्य आहे. त्यात उद्या बदल होऊ शकतो .आणि हेच विज्ञान देखील मान्य करते की आम्ही सांगतो ते अंतिम सत्य आहे असे नव्हे उद्या त्यात नवीन शोध लागू शकतो. दुसरे नवे सत्य समोर येऊ शकते. विज्ञानाच्या या आठ ही कसोट्या पाहिल्या तर आपल्याला दिसून येते. तथागत बुद्धांनी जे सांगितले तेच विज्ञानाने मान्य केले स्वीकारलं. म्हणून विज्ञान हे धम्म यावर आधारित आहे.
संकलन :- संजय सखाराम पवार, अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या