बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे रेल्वे फलाट वर विकलांग शौचालय असून तिथे पाणी ची व्यवस्था नाही आहे. मागील पाच महिन्यापूर्वी फलाट क्रमांक एक वर विकलांग प्रवाश्याकरीता शौचालय चे बांधकाम करण्यात आले. तिथे मागील दीड महिन्यापासून पाण्याची व्यवस्था नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तिथे पाणीची टाकी असून ते शोभा वाढवत आहे. तसेच बाजूला जीआरपी पोलीस चौकी असून तिथे सुद्धा मागील एक ते दीड महिन्यापासून पाणी ची पुरवठा होत नाही आहे. जीआरपी चौकीत पोलीस बॅरेक व पोलीस कोठडी सुद्धा आहे. जीआरपी चौकीत शौचालय व बाथरूम ची सोय असून तिथे मागील दीड महिन्यापासून पाणी उपलब्ध नसल्याने त्यांना फलाट वरून पाणी आणावे लागत आहे. तिथे बाहेरून आलेल्या पोलीसांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील पोलीसांनी या बाबत रेल्वेच्या आयडब्लू अधिकाऱ्यांना ना तक्रार केली पण त्यांच्या असहकार्य मुळे व्यवस्थित पाण्याचा पुरवठा होत नाही आहे. यामुळे दिव्याग प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या