महाकाली मंदिराच्या मागील खुल्या पटांगणावर अनोळखी बेशुद्धावस्थेत आढळला, मात्र तपासणी अंती मृत असल्याचे कळले, शहर पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन (Stranger found unconscious in open padang behind Mahakali temple, but found dead after investigation, city police appeal for identification)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- दिनांक 30/5/24 रोजी 16/15 वाजता महाकाली मंदिर चंद्रपूर चे मागे खुले पटांगणात एक अनोळखी इसम पुरुष वय अंदाजे 60 वर्ष रां.महाकाली मंदिर चंद्रपूर परिसर येथे झोपलेल्या अवस्थेत पडून आहे अशी महिती प्राप्त होताच Hc रमेश मेश्राम,PC मनोज कोयचाडे हे तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर अनोळखी इसम हा काहीच हालचाल करीत नसल्याने व कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्यास उपचारास सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता डॉ.अतुल सिंह यांनी तपासून दि. 30/5/24 चे 17/05 वाजता मृत घोषित केले वरून HC रमेश मेश्राम/2104 यांचे रिपोर्ट वरून दि. 31/5/24 रोजी मर्गं क्र. 65/24 कलम 174 crpc नोंद करण्यात आले आहे. सदर अनोळखी मृतक इसमाचा वर्णन:- वय अंदाजे 60 वर्ष , रंग गव्हाळ, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी, मीशी, वाढलेली काळी पांढरी रंगांची, अंगात फिक्कट मेहंदी रंगाचा फुल शर्ट, व काळया रंगाचा, मळलेला फुल पॅन्ट घातलेला हाता पायावर माती चे डाग असलेले सदर वर्णन असलेल्या इसम बाबत माहिती असल्यास त्वरीत तपास अधिकारी psi विजय मुके मो. क्र. 9923401065 यांचेशी संपर्क साधावा ही विनंती असे आवाहन चंद्रपूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)