धक्कादायक ! IAS अधिकाऱ्यांच्या मुलीची मंत्रालयाच्या समोरच्या बिल्डींगवरून उडी घेऊन आपल आयुष्य संपवलं (Shocking ! Daughter of IAS officer ends her life by jumping from building in front of ministry)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! IAS अधिकाऱ्यांच्या मुलीची मंत्रालयाच्या समोरच्या बिल्डींगवरून उडी घेऊन आपल आयुष्य संपवलं (Shocking ! Daughter of IAS officer ends her life by jumping from building in front of ministry)


मुंबई :- देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तयारी सुरु असताना मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहिती नुसार विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आयएएस अधिकारी विकास आणि राधिक रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली. मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीमध्ये हे आयएएस दाम्पत्य राहतं. रस्तोगी दाम्पत्याच्या मुलीने राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. विकास रस्तोगी हे उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत. लिपी रस्तोगी असं या मुलीचं नाव असून ती 26 वर्षांची आहे. विकास रस्तोगी हे १९९७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. लिपी रस्तोगी ही अभ्यासात तितकीशी पुढे नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात होती. आई-वडील इतके मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही अशी भीती लिपी रस्तोगीला सतावत होती. त्यातूनच तिने आयुष्य संपवल्याची चर्चा मंत्रालय परिसरात चर्चा आहे. दरम्यान, सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. नरिमन पॉईंट परिसरात रस्तोगी यांचे शासकीय निवासस्थान आहे. लिपी रस्तोगी हिने या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारली. ती खाली कोसळल्याचे कळताच लिपीला उपचारासाठी तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. लिपी ही हरियाणातील सोनिपत येथे एल.एल.बी. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. मात्र, शैक्षणिक कामगिरी समाधानकारक नसल्याने ती चिंतेत होती. तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. तिने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)