बल्लारपूर शहरातील घटना कापड व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न फसला (Incidents in Ballarpur city An attempt to rob a textile merchant failed)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर शहरातील घटना कापड व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न फसला (Incidents in Ballarpur city An attempt to rob a textile merchant failed)


बल्लारपूर :- बल्लारपुरातील बस्ती विभागात असलेल्या प्रतिष्ठित मालू प्रतिष्ठानच्या संचालकाला लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याने व्यावसायिकां मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अयशस्वी प्रयत्नाचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. शहरातील गांधी चौक परिसरात अनेक वर्षांपासून मालू परिवाराचे कपड्यांचे दुकान आहे. दुकानामागे मालू कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. शुक्रवारी (दि. 21) रात्री 9.15 वाजताच्या सुमारास दुकान मालक यश रोख रक्कम घेऊन घराकडे निघाला. दुकान आणि घरामधील अंतर जेमतेम 50 मीटर असेल. सुनिल यांनी घराचा दरवाजा उघडून आत येताच त्याच्या मागे गुन्हेगारासारखा दिसणारा तरुण चाकू घेऊन आला. यशकडून रोकड लुटण्याचा त्याचा हेतू होता. त्याच्या मागे सराईत गुन्हेगाराचे अन्य दोन साथीदार आले. मात्र तोपर्यंत यश घरात पोहोचला होता. सर्व तरुणांनी डोक्यावर टोप्या आणि चेहऱ्यावर मास्क घातले होते. दरोड्याचा प्रयत्न फसल्यानंतर सर्व गुन्हेगार तेथून गायब झाले. मात्र तोपर्यंत घराच्या बाल्कनीत उभा असलेला सुनिल आणि त्याचा भाऊ या दोघांना ही बाब कळली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य पाहून रात्रीच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण करताना ही काही सेकंदांची बाब असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हेगार चुकले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. सध्या पोलिस उपनिरीक्षक कांकीडवार या प्रकरणाचा तपास करीत असून गुन्हेगारांचा शोध घेत आहे. अलिकडे जिल्ह्यासह बल्लारपूर शहरात देखील गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अवैध दारूतस्करी, रेतीतस्करी, सट्टापट्टी, शस्त्र घेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, घरफोडी, लुटपाट अशा घटना वाढत असून गुन्हेगार हळू हळू आपले पाय पसरवित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा घटनावर आळा बसविण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)