बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील गोल पूल हे वस्ती विभाग व नवीन शहराला जोडणारा मार्ग मात्र रेल्वे विभागाच्या तिसऱ्या मार्गीकेच्या विस्तारिकरणाच्या कार्यामुळे व अशातच शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित रहावा म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून पाईपलाईन गोल पुलामधून टाकण्यात आली होती मात्र यामुळे वाहतुकीला अळथळा तर होतोच पण गोल पुलात हलका पाऊस पडल्यास पाणी साचतंय त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता या समस्यावर अनेक राजकीय पक्ष व संघटनानी रेल्वे व पाणी पुरवठा विभागाला निवेदने दिलीत व या अनुषंगाने ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सदस्य ZRUCC मध्य रेल्वे मुंबई अजय दुबे यांनी डीआरएम मध्य रेल्वे नागपूर यांच्या सूचनेवरून बल्लारशाह रेल्वे गोल येथून पाईपलाईन हलविण्यात यश मिळवले. मध्य रेल्वे बल्लारशाहने यासाठी मार्च महिन्यातच मंजुरीसाठी पत्र लिहून पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश दुबे यांना दिले होते. अजय दुबे यांनी 22 मे रोजी डीआरएम श्री मनीष अग्रवाल यांची भेट घेतली होती आणि पाइपलाइन स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला त्वरित मंजुरी देण्याची विनंती केली होती. पाइपलाइनचे स्थलांतर लवकरच होणार असल्याने गोल पुलावरून ये-जा करताना मोठा दिलासा मिळणार असल्याचे एमजेपीचे उपविभागीय अभियंता सतीश गोरलवार यांनी सांगितले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या