अखेर 5 दिवसांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळला त्या सुरक्षारक्षकाचा मृतदेह, हत्या की आत्महत्या तर्कवितर्काना उधाण (After 5 days, the body of the security guard was found under the pile of mud.)

Vidyanshnewslive
By -
0
अखेर 5 दिवसांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळला त्या सुरक्षारक्षकाचा मृतदेह, हत्या की आत्महत्या तर्कवितर्काना उधाण (After 5 days, the body of the security guard was found under the pile of mud.)


बल्लारपूर :- बल्लारपूर वेकोली क्षेत्राअंतर्गत सास्ती खुल्या खाणीत 24 मे 2024 पासून बेपत्ता असलेला सुरक्षारक्षक आज मातीचा ढिगारा काढत असताना मृतदेह सापडल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुरक्षा रक्षक सोहेल खानचा कामावर असताना मातीच्या ढिगाऱ्यात गाडून मृत्यू झाला की हत्या? या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. कामगारांत चर्चा  आहे की मृतक सोहेल खान यांची सुरक्षा अधिकारी यांच्याशी वाद झाल्याची सूत्रांची माहिती असून त्यांनी या माध्यमातून वचपा तर काढले नाही ना ? त्या दिवशी मयत रजेवर असतानाही त्याचा बदला घेण्याकरीता त्याला बळजबरीने कामावर घेऊन गेल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस करीत असून लवकरच या अपघाताची सत्यता उघडकीस येईल.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)