पुणे कल्याणीनगर अपघात म्हणजे शासकीय यंत्रणेचा गैरवापर, आलीशान गाडीचा अपघात घडवा आणि ३००शब्दांचा निबंध लिहा, भलेच दोन चार माणसं मेली तरी.....! (Pune kalyaninagar accident is misuse of government machinery, cause a luxury car accident and write a 300 word essay, even if two or four people die.....!)

Vidyanshnewslive
By -
0

पुणे कल्याणीनगर अपघात म्हणजे शासकीय यंत्रणेचा गैरवापर, आलीशान गाडीचा अपघात घडवा आणि ३००शब्दांचा निबंध लिहा, भलेच दोन चार माणसं मेली तरी.....! (Pune kalyaninagar accident is misuse of government machinery, cause a luxury car accident and write a 300 word essay, even if two or four people die.....!)

देशात कायदा विकत घेता येतो हे पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरण त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.


वृत्तसेवा :- दिनांक १९ मे च्या पहाटे अडीच तीन च्या सुमारास पुणे येथील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरण आता वेगवेगळे वळणे घेत असून कांद्याचा एक एक पापुद्रा उलगडावा त्या प्रमाणे पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी वेंदात अग्रवाल ला वाचविण्यासाठी कोणी कोणी मदत केली याची एक यादीच तयार होतांना आपण पहात आहोत आता या प्रकरणात पोलीस आमदार सोबत ससून रुग्णालयांतील डॉक्टरांनी आरोपीचे रक्ताचे नमुने कसे बदलले याचा उलगडा खूद्द पुण्याचे पोलीस आयुक्तांनी आपल्या कालच्या पत्रकार परिषदेत केला.आरोपीच्या ब्लड सम्पल प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डाक्टरांना पुणे पोलीस गुन्हे शाखेने कालच अटक केली. एखादा चित्रपटातील घटना क्रम पहात तसा एकापेक्षा एक सस्पेन्स हळूहळू उलगड होत असल्याचा भास आपणास जरूर होईल, इतकी मजेशीर, धक्कादायक आणि शासकीय यंत्रणा खालपासून वरपर्यंत पैसे दिल्यास काही ही करायला कशी तयार होते याचा हा एक नमुनाच म्हणावा लागेल, एखाद्या विद्यापीठात पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणावर डाक्टरेट करण्यास काहीच हरकत नाही, देशात कायदा विकत घेता येतो हे पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरण त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल, येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पदावरचा एक आणि एपीआय पदावरचा एक असे दोन पोलिस अधिकाऱ्यांना या आधीच पुणे पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहेत, येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस पुण्याच्या कल्याणी नगर अपघात प्रकरणाचे मुख्य खलनायक ठरले. महाराष्ट्रातील कुठल्याही पोलीस ठाण्यात जा असे दोन चार खलनायक हमखास सापडतील,ही आता नवीन बाब राहिलेली नाही,यात राजकारणातील मंत्री आमदार हे खलनायकांचे जानी दोस्त,? पुण्याच्या पालकमंत्र्यांना पुण्याच्या कल्याणी नगर अपघात प्रकरणाची फार उशीरा जाग आली, आपण बदनाम होतोय अशी कल्पना आल्यावर पालकमंत्री खाडकन जागे झाले,सगळी बोंबाबोंब झाल्यावर आदेशच आदेश देत सुटले, केले मात्र काहीच नाही? या अपघात प्रकरणात बालहक्क न्यायालयाने एक नवाच पायंडा पाडला म्हणावा लागेल, आलीशान गाडीचा अपघात घडवा आणि ३००शब्दांचा निबंध लिहा, भलेच दोन चार माणसं मेली तरी काही हरकत नाही, आणि ओरड झालीच तर आरोपीला बालसुधारगृहात पाठवून द्या, टेम्पो चा अपघात झाला तर १० वर्षाची शिक्षा, रिक्षा चा अपघात झाला तर ७ वर्षाची शिक्षा, आलीशान गाडीचा अपघात झाला तर ३०० शब्दाचा निबंध लिहा मग झाली सुटका? कायदा फक्त गरीब प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांसाठी संसंद ने तयार केला आहे, देशातील वीस टक्के लोकांना तो लागू पडत नाहीत, हे या देशातील राहणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीय, इमानदार लोकांचे दुर्दैव म्हणावे आणि श्रीमंत बिल्डर उद्योग पती, राजकारणी मंत्री आमदार खासदार यांचे सुदैव म्हणावे लागेल, या उच्चवर्गीय लोकांच्या दिमतीला प्रशासन तयार असतेच, सोबत पोलीस चोवीस तास ड्युटीला? ज्यांच्यावर जनतेच्या सरंक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्या देखत त्यांच्या साक्षीने हे होत असते हे त्याही पेक्षा भयानक म्हटले पाहिजे, पुण्याच्या कल्याणी नगरात दोन तरुण तरूणी चा जीव घेतलेल्या अपघात प्रकरणांचा खरंतर सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे. सरकार मनुस्मृती चा समावेश शालेय अभ्यासक्रमात करणार अशी चर्चा सुरू आहे त्यात ह्याही पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणाची चर्चा झाली पाहिजे,म्हणजे पुढच्या तरुण पिढीला पुणे अपघात प्रकरणापासून प्रेरणा मिळू शकेल. सरकार आणि त्याची भ्रष्ट यंत्रणा कशी काम करते याची नवीन पिढीला ओळख होईल? पुण्याचे कल्याणी नगर चे अपघात प्रकरणा सारखे छोटे मोठी प्रकरणे, ज्युनिअर केजी, आणि सिनीयर केजी,च्या अभ्यासक्रमात समावेश केल्यास या प्रकरणाचे बालवयातच संस्कार होतील, पुढे भविष्यात अशा संस्कारीत पिढीला सरकार आणि प्रशासन चालविणे सोपे जाईल, सरकारला प्रशासन चालवितांना कुठलीही अडचण येणार नाही? पुण्याचे नागरीक रस्त्यावर उतरले आणि सरकारमधील प्रशासनाचे पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलीसांच्या अब्रूचे लक्तरे वेशीवर टांगली गेली, पुणेकरांनी आता पुणे कल्याणीनगर अपघात सारखी प्रकरणे शालेय अभ्यासक्रमात समावेश करा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे,आंदोलन केल्या शिवाय सरकार दखल घेत नाही हे याच पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणाने दाखवून दिले आहे, मग चला तर नवीन पिढीला सक्षम करण्यासाठी पुढे या ?

संकलन :- अरुण पाटील, (दैनिक तोफ) मो.नं. 9420443944

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)