दहावीचा निकाल जाहीर, राज्यात कोकण विभाग अव्वल 99.01% तर नागपूर विभागाचा निकाल 94.73% सर्वात कमी (10th result declared, Konkan division top 99.01% while Nagpur division result 94.73% lowest in the state)
वृत्तसेवा :- विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा कोकणने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. तर मुलींच्या निकालाची टक्केवारी राज्यात सर्वाधिक आहे. यंदा निकालादरम्यान एक मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिचेकिंगला टाकायचं आहे किंवा आपला उत्तर पत्रिका पाहायची आहे त्यासाठी काही बदल बोर्डनं केले आहेत. जे विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप समजून घेणं महत्त्वाचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडले असतील किंवा त्याला वाटत असेल की पुन्हा रिचेकिंगला करायचं असेल तर त्यासाठी देखील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना फोटो कॉपी हवी असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 28 तारखेपासून 11 जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत. जवळपास ही 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रति विषय 400 रुपये भरुन फोटो कॉपी घेता येणार आहे. दोन विषयाची फोटो कॉपी घेतली तर आणखी काही विषयाची फोटो कॉपी घेत असेल तर ती परवानगी देखील देण्यात येणार आहे. यापूर्वी फोटो कॉपीसाठी एकदाच अर्ज करता येत होता. मात्र आता विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा अर्ज करुन फोटो कॉपी घेण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्याने सहावेळा सहा विषयाची फोटो कॉपी घेतली किंवा एकदाच घेतली तरीही चालणार आहे. बोर्डाने यावर्षीच्या निकालात हा एक बदल केला आहे. अध्यक्ष राज्य मंडळ शरद गोसावी यांनी दिली महत्त्वाची माहिती. कोकण ९९.०१ टक्के विभाग अव्वल, नागपूर विभाग निकाल कमी ९४.७३, ७२ विषयांपैकी १८ विषय निकाल १०० टक्के, ९३८२ शाळा निकाल १०० टक्के गेल्या वर्षी पेक्षा १.९८ टक्के निकाल जास्त लागलं.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या