बल्लारपूरात पत्नीच्या विरहात एका युवकांची गळफास घेऊन आत्महत्या (In Ballarpur, a youth commits suicide by hanging himself after losing his wife)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानीक विद्या नगर वॉर्ड येथील स्वप्नील रमेश करमनकर वय 33 वर्ष रहिवासी असून त्यांचे तीन वर्ष पूर्वी लग्न झाले होते. मात्र मागील सात आठ महिन्यांपासून त्यांची पत्नी माहेरी राहत होती. त्याच्या पत्नीने त्याच्या विरोधात महिला तक्रार निवारण केंद्र मध्ये तक्रार केली असल्याची माहिती असून त्याला पोटगी मागत होती. तो मजुरी चे काम करत होता तसेच त्याच्या जवळ पत्नी राहत नव्हती म्हणून तो काही दिवसापासून मानसिक तणावात असल्याची माहिती आहे व या तणावातून पत्नीच्या विरह सहन न झाल्याने स्वप्नील ने गळफास घेतल्याची घटना आज सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. स्वप्नील रमेश करमनकर (33) असे त्या पतीचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहे.विशेष म्हणजे स्वप्नील हा जय भीम बहुउद्देशीय संस्था जय भीम चौक बल्लारपूर येथील कार्यकर्ते देविदास करमनकर यांचे पुतणे आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या