बौद्ध अनुयायांनी डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या आचारसंहितेचा वापर करुन जीवन जगावे !- डॉ ललित बोरकर (Buddhist followers should live their lives using the code of ethics given by Dr. Babasaheb!- Dr. Lalit Borkar)
बुद्ध पहाट कार्यक्रमात दिव्यांग सांस्कृतिक व पूनर्वसन संस्था, अकोला द्वारा कलाकारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
बल्लारपूर :- बुध्द जयंतीच्या पर्वावर भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समिती द्वारे बुध्द विहाराच्या समोरील पटांगणात पहाटे ५.३० वाजता बुद्ध पहाट कार्यक्रम संपन्न झाला. दिव्यांग सांस्कृतिक व पूनर्वसन संस्था, अकोला द्वारा संचालित स्वरधारा प्रस्तुत बुध्द पहाट हा कार्यक्रम संपूर्ण दिव्यांग(अंध) कलाकारां द्वारा एक आगळा वेगळा प्रयोग पार पडला. एकास एक सुमधुर बुद्ध गीते सादर केलीत. सर्व कलाकारांनी उपस्थितांची मने मंत्रमुग्ध केलीत.सर्व कलाकारांना गाणे पाठ होती हे विशेष ! अनेक कलाकार प्रत्येक गाणे पाहून म्हणतात ना परंतु ह्या कलाकारांनी सर्व जनतेची मने जिंकली! हजारो श्रोते हजर होते. फोटो स्टुडिओ असोसिएशनचे वतीने खीर दान करण्यात आले.
भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार समितीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती समारोह संपन्न झाला. त्यात प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ चे जेष्ठ धम्म अभ्यासक डॉ ललित बोरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की बौद्ध अनुयायांनी आपले जीवन सुखकर करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा देतांना दिलेल्या आचारसंहितेचा वापर आपल्या जीवनात करावे असे आवाहन केले. कार्यक्रमात सुरुवातीला त्रिशरण, पंचशील घेण्यात आले.५ वर्षाची चिमुकली तृषा वासेकर हिने सर्व उपस्थितांना मराठीतून पंचशील दिले.तर विधायक पंचशील ६ वर्षाचा शास्वत देवगडे यांनी दिले.धम्मवर्गातील विद्यार्थ्यांद्वारे बुध्द पूजा घेण्यात आली. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सुद्धा विहारात कार्यक्रम घेण्यात आला. डॉ बोरकर पुढे म्हणाले की डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा काटेकोर पालन केल्यास आदर्श नागरिक घडू शकतो.धम्मचारी रत्ननायक यांनी भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या दुःखातून मुक्ती शक्य आहे.त्या मार्गाने चालण्याची गरज आहे. पाली विहारात लहान मुलांवर संस्कार केल्या जात आहे हा मैलाचा दगड ठरू शकतो. असे अनुकरण करुन इतरही विहारात असे उपक्रम राबविण्यात यावे असे अवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान धम्ममित्र भास्कर भगत, डॉ अजय जुमडे, बोरकर मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन परमानंद भडके, प्रास्ताविक नंदाताई मून, तर आभार संपत कोरडे यांनी मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या