नागपूर -: मुख्यत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण व फार तर फार कला ,वाणिज्य आणि विज्ञान, केवळ हेच् आपले करिअर घडविण्याचे पर्याय आहेत, ही सर्वसामान्य धारणा, विद्यार्थी व पालकांमध्ये रुजलेली दिसून येते. परंतु या व्यतिरिक्तही १० वी व १२ वी नंतर, डझनभर कोर्सेस उपलब्ध असून जे उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात सक्षम आहेत. तसेच विद्यार्थी परदेशी शिक्षण, स्पर्धा परिक्षा, रोजगार संधी, आणि स्वयंरोजगारा मधेही आपले भवितव्य सुकर करु शकतो. या अभ्यासक्रमां विषयी सर्व विद्यार्थांना मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने, बानाई, नागपूर द्वारा, विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम, आयोजित करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या आयोजनात सहभागी मार्गदर्शक येणेप्रमाणे असतील कार्यक्रमाध्यक्ष इंजिनियर अजय सावतकर (ITS), से.नि. प्र. महाप्रबंधक, तथा उपाध्यक्ष बानाई नागपूर. तर प्रमुख वक्ते - 1) इंजिनियर अनिल रामटेके (IRSS.) से. नि. प्रधान सामग्री प्रबंधक रेल्वे, तथा मार्गदर्शक वक्ता. २) आयु.अश्विन कापसे, सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट. ३) आयु डॉ. पल्लवी मेश्राम, (एम.बी. बी.एस.) ४) इंजिनियर संदीप लांजेवार, प्राध्यापक, गुरुनानक इंजिनियरींग काॅलेज. ५) आयु. सुमित जांभूळकर, बी.ए. (अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, बंगरुळू हे पांचही अनुभवी वक्ते आपले मार्गदर्शन करतील. या सोबतच, उच्चशिक्षण आणि परदेशी शिक्षण संधी, या बाबत सुध्दा मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी नोट्स इ. घेण्यासाठी आपल्या सोबत, पेन आणि नोटबुक आणणे अनिवार्य आहे. पालकांनी विद्यार्थ्यांसोबत यावे, ही विनंती. कार्यक्रम निःशुल्क असला तरीही आसनव्यवस्था कमी असल्यामुळे कार्यक्रमपूर्व नांव नोंदणी अनिवार्य आहे. याची आवर्जून नोंद घ्यावी. संपर्क फोन - 9552425154 (प्रफुल्ल) दिनांक 26/05/2024, रोज रविवार स्थळं: डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला काॅलनी, वर्धा रोड नागपूर- १५. सायंकाळी 5.30 वाजता. तरी या मार्गदर्शनाला उपस्थित राहण्याचं आवाहन बानाई कार्यकारिणी समिती, नागपूर यांनी केल आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या