नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाच्या परीक्षाचे पॅटर्न बदलणार, आता विद्यापीठ स्तरावर 60 गुणांची परिक्षा तर महाविद्यालय स्तरावर 40 गुण असणार (According to the new education policy, the university exam pattern will change, now university level exam will have 60 marks and college level will have 40 marks.)

Vidyanshnewslive
By -
0
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाच्या परीक्षाचे पॅटर्न बदलणार, आता विद्यापीठ स्तरावर 60 गुणांची परिक्षा तर महाविद्यालय स्तरावर 40 गुण असणार (According to the new education policy, the university exam pattern will change, now university level exam will have 60 marks and college level will have 40 marks.)


वृत्तसेवा :- आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५)  सोलापूर विद्यापीठासह राज्यातील सर्वच महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणात नवीन धोरण लागू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पदवी चार वर्षांची तर पदव्युत्तर पदवी एक वर्षाची असणार आहे. तर परीक्षा पॅटर्न देखील बदलणार आहे. विद्यार्थ्यांच्या ४० गुणांची जबाबदारी महाविद्यालयांवर (कॉलेज असेसमेंट) तर ६० गुणांची परीक्षा विद्यापीठ (विद्यापीठ असेसमेंट) घेणार आहे. नवीन धोरणात परीक्षेची सेमिस्टर पद्धत कायम ठेवण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत देखील बदल होणार आहे. सध्याच्या प्रचलित परीक्षा पद्धतीनुसार ८० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर २० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतली जाते. पण, आता नवीन धोरणानुसार विद्यापीठाकडून ६० गुणांची तर महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.
            नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता पदवीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला प्रवेश घेताना तीन विषय कंपल्सरी निवडावे लागतील. दुसऱ्या वर्षात गेल्यावर तीनपैकी एक विषय अनिवार्य असेल आणि उर्वरित दोनपैकी एक विषय त्याला ऑप्शनल म्हणून घेता येईल. तिसऱ्या वर्षात गेल्यावर मात्र, त्याला एकच विषय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करता येईल. पदवीच्या चौथ्या वर्षात त्याला ऑनर्स किंवा रिसर्च यातील एक पर्याय निवडून शिक्षण घ्यावे लागणार आहे. म्हणजेच नवीन धोरणानुसार पदवीच्या पहिल्या वर्षात तीन मेजर (अनिवार्य) विषय, दुसऱ्या वर्षात एक मेजर व एक मायनर (ऑप्शनल तथा दुय्यम विषय) विषय आणि तिसऱ्या वर्षात एकच मेजर विषय विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार आहे. महाविद्यालयांमध्ये जे विषय आहेत, त्यांचे ग्रुप तयार केले जातील. त्यातील आवडीच्या विषयांची निवड विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्षाची सुरवात होण्यापूर्वी नवीन धोरणाची विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना माहिती व्हावी म्हणून विद्यापीठाच्या पुढाकारातून महाविद्यालय स्तरावर २७ मेपासून कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातील शंका, संभ्रम व प्रश्न दूर होतील हा हेतू आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमध्ये केली जाणार आहे. नवीन धोरणानुसार परीक्षेचा पॅटर्न ६०-४० असा असेल. ६० गुणांची परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जाईल तर ४० गुणांची परीक्षा महाविद्यालये घेतील.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)