धक्कादायक ! प्रेमविवाहाला नकार दिला म्हणून 6 महिन्यापूर्वी विज करंट लावून वाघाच्या हत्याचे प्रकरण आणले उघडकीस (Shocking ! A case of killing a tiger by applying electric current 6 months ago for refusing a love marriage was brought to light)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! प्रेमविवाहाला नकार दिला म्हणून 6 महिन्यापूर्वी विज करंट लावून वाघाच्या हत्याचे प्रकरण आणले उघडकीस (Shocking ! A case of killing a tiger by applying electric current 6 months ago for refusing a love marriage was brought to light)


मूल :- चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे एक प्रकरण उघडकीस आल्याचा अजब आणि तितकाच रंजक प्रकार समोर आलाय. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मूल तालुक्यातील उथळपेठ येथील ही घटना असून गावातील एका मुलाचे आणि मुलीचे प्रेमसंबंध होते. या प्रकरणातील संशयित आरोपी सुरेश चिचघरे यांनी आपल्या गावाजवळील शेतात मका पिकाची लागवड केली होती. या मका पिकांच्या संरक्षणासाठी त्यांनी ताराच्या कुंपणात करंट सोडला होता. या करंटचा धक्का लागून त्यात एका वाघाचा मृत्यू झाला. मात्र, कारवाईच्या भीतीपोटी या शेतकऱ्याने इतर सहकार्याच्या मदतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मृत वाघाचा मृतदेह शेतात खड्डा खणून पुरून टाकला. मात्र, कालांतराने या प्रकरणाची कुणकुण या प्रकरणातील प्रियकर तरुणाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना लागली होती. त्यामुळे मुलाच्या वडिलांनी रितसर मुलीच्या वडिलांकडे जाऊन लग्नाची मागणी घातली. मात्र, मुलीच्या वडिलांनी या लग्नासाठी नकार दिला. सोबतच मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात मुलीला त्रास देत असल्याची पोलिसात तक्रार देखील केली. या प्रकारामुळे संतप्त मुलाच्या वडिलाने मुलीच्या वडिलाने 6 महिन्यापूर्वी केलेल्या वाघाच्या एका शिकारीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. या बातमीमुळे वन विभागसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच मुलीच्या वडीलाने मुलगा आणि त्यांच्या वाडीलांसोबत गैरवर्तन केल्याच्या संतापातून या तरुणाच्या वडीलाने हे प्रकरण उघडकीस आणत एकच खळबळ उडवली. हे बिंग फोडल्याने वनविभागाने संशयित आरोपी सुरेश चिचघरे आणि त्याचा साथीदार श्रीकांत बुरांडे याला अटक केली आहे. सध्या वनविभाग या प्रकरणाचा सखोल चौकशी करत तपास करत आहे. मात्र, प्रेमविवाहाला नकार दिल्याने हे प्रकरण आता थेट वाघाच्या शिकारीपर्यंत जाऊन पोहचलय.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)