चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव-मानव संघर्षात वाढ, चिमूर तालुक्यातल्या खानगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू झालाय (Increase in wildlife-human conflict in Chandrapur district, young farmer killed in tiger attack at Khangaon in Chimur taluka)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या खानगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. श्रावण खोब्रागडे (वय 34) असे मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. श्रावण खोब्रागडे हा स्वतःच्या शेतात पीक आणि जनावर देखभालीसाठी गेला होता. रात्री उशिरा तो शौचास नाल्यानजीक गेला. त्यावेळी वाघाने त्याच्यावर झडप घातली. सकाळी श्रावण घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. तेव्हा रात्री घडलेली घटना समोर आली. ग्रामस्थांनी रास्ता राेकाे करीत वन विभागाला वाघाला पकडण्यासाठी तातडीने ठाेस पावलं उचला अशी मागणी केली. या भागात वाघाच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेनंतर गावकऱ्यांनी रस्त्यात आंदाेलन करीत वारसाला नोकरी, जंगलाला कुंपण आणि बफर भागातील नीमढेला सफारी प्रवेशद्वार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली. वन आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून परिस्थितीवर मार्ग काढला जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या