नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रम होणार 4 वर्षाचा, 2024-2025 पासून होणार अमलबजावणी (According to the new education policy, the degree course will be of 4 years, to be implemented from 2024-2025.)
वृत्तसेवा :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी 2024 - 25 पासून होणार आहे. या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठासह सर्व महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक बदल होणार आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती घेणे खूप गरजेचे आहे. अनेकवेळा मुले बारावीनंतर पदवीला ऍडमिशन घेतात. परंतु पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर काही कारणामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. परंतु त्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाचे स्वतंत्र प्रमाणपत्र मिळतील. 2 वर्षे पूर्ण केल्यानंतर अर्ध्यातून शिक्षण सोडल्यास त्यांना डिप्लोमाचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्षानंतर शिक्षण सोडल्यास त्यांना सध्याच्या नियमानुसार प्रमाणपत्र मिळेल. परंतु चौथ्या वर्षाचे पूर्ण शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला ओनर्स किंवा रिसर्च या विषयातून डिग्री मिळणार आहे. ही पदवी प्राप्त केल्यानंतर ती विद्यार्थ्याला पदवीत्तर पदवीसाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळेल. तीन वर्षानंतर जर त्यांनी शिक्षण सोडले, तर पदवी तर पदवीला प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याला दोन वर्ष शिकावे लागणार आहे. यावर्षी बारावीचा निकाल 20 ते 25 मे दरम्यान जाहीर होणार आहे. निकालानंतर विद्यार्थी लगेच पुढील शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू करतात. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. पण डीएड आणि बीएड प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रमाने कालावधी हे पूर्वीप्रमाणेच असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. पदवीधर पदवीच्या विद्यार्थ्यांना तीन किंवा चार वर्षाची पदवी पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याची संधी मिळणार आहे. त्यानुसार पहिल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्रात रिसर्च, तर दुसऱ्या सत्रात जॉब ट्रेनिंग असे विषय असतील. पदवीधर पदवीच्या शेवटच्या सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याला शोध निबंध बंधनकारक असणार आहे. या विषयावर त्याला अहवाल द्यावा लागणार आहे. तरच पदवीत्तर पद्धतीचे शिक्षण पूर्ण होणार आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या