पेपर मिल "लाकुड स्टॉक यार्ड" संदर्भात माहिती देण्यासाठी टाळमटाळ का करत आहे.? -"AAP बल्लारपूर" (Why is paper mill reluctant to provide information regarding "wood stock yard"? -"AAP Ballarpur")
बल्लारपूर :- बल्लारपुर शहरात अनेक दिवसापासून वन्याजीवांच्या हौदोसामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, यासाठी प्रामुख्याने शहरालगत असलेले पेपरमिल चे लाकुड़ स्टॉक यार्ड जबाबदार आहे. येथे वन्य जीव लपुन बसतात व लगतच्या नागरी वस्तीत प्रवेश करतात, तसेच कळमना सारखा मोठा अपघात होण्याची देखिल शंका निर्माण झाली आहे. म्हणून या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीत पेपरमील व्यवस्थापन सोबत "AAP" बल्लारपूर शिष्ठ मंडळासह तीन बैठका झाल्या परंतु पेपरमील प्रशासनाने लाकूड स्टॉक यार्ड स्टाॅक यार्ड च्या अटी शर्ती संदर्भात कुठलीच माहिती पुरवू शकली नाही, म्हणून अटी शर्तची परवाने संबंधीची माहिती लिखित स्वरूपात एका आठवड्यात द्यावी अशी मागणी शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी श्री. मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद बल्लारपूर व श्री. प्रादेशिक अधिकारी साहेब प्रदूषण नियंत्रण विभाग जिल्हा- चंद्रपूर यांना केली. यावेळी जिल्हा संघठण मंत्री भीवराज सोनी व योगेशभाऊ मुरेकार, जिल्हा महिला अध्यक्षा ज्योतीताई बाबरे, महानगर माजी महीला अध्यक्षा ऍड. सुनिताताई पाटील, बल्लारपूर शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, शहर प्रवक्ता असीफ शेख, महानगर महिला अध्यक्षा ऍड. तब्बसुम शेख, युथ अध्यक्ष सागर कांबळे, महीला अध्यक्षा किरणदीदी खन्ना, महीला उपाध्यक्षा सलमाबाजी सिद्दिकी, मनिषाताई अकोले, रेखाताई भोगे, महेंद्र थोरात, लक्ष्मण पाटील, दीपक घोडगे व इत्यादी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या