डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक संपन्न (On the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti, the Peace Committee meeting was held in Ballarpur Police Station)
बल्लारपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नसून विचार होय अशा त्या महामानवांची जयंती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतें यावर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी होत असतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषन्गाणे पोलीस स्टेशन बल्लारपूरच्या प्रांगणात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन आज सायंकाळी 5:00 वाजता करण्यात आले होते या बैठकीला मा. उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांनी मार्गदर्शन करतांना विविध प्रकारच्या सूचना दिल्यात तसेच बल्लारपूर शहर हे शांततेसाठी अवघ्या जिल्ह्यात प्रसिध्द आहे जिथे मागील काही दिवसात सण उत्सव साजरे होत असतांना राज्याच्या विविध भागात अनेक गुन्हे दाखल झाले असतांना बल्लारपूर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तशीच अपेक्षा येत्या 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं बल्लारपूर शहरात राहील असे मत व्यक्त केले तसेच जयंतीच्या निमित्तानं नगर परिषद परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात आवश्यक त्या सोईसुविधा प्रदान करण्यात येइल. बल्लारपूर शहराच्या विविध भागातून जयंतीच्या निमित्तानं मिरवणुका निघतात या मिरवणुका काढताना स्वतः सह इतरांची काळजी घ्यावी व जबाबदारीचे भान ठेवावं. अशा प्रकारचं आवाहन उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांनी केले. या शांतता समितीच्या बैठकीला भारत थुलकर, प्रशांत झामरे, संजय डुंबेरे, प्रा. महेंद्र बेताल, संजय लोहकरे, एड. पवन मेश्राम, दिपक भगत, श्रीनिवास मासे, धम्मा मून, राकेश सोमाणी, यांच्या सह बल्लारपूर शहरातील अनेक बुध्द विहाराचे प्रतिनिधी भीम जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments