धक्कादायक ! घुग्गुस रेल्वे सायडिंग मध्ये रंगपंचमीच्या दिवशी आढळला रेल्वेच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन येथून इंजिन आले असल्याने बिबट्या हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील असण्याची शक्यता ! Shocking! A dead body of a leopard was found on the railway engine on Rangpanchami in Ghuggus railway siding, since the engine came from Chandrapur thermal power station, it is possible that the leopard is from the Tadoba-Andhari tiger reserve!

Vidyanshnewslive
By -
0

धक्कादायक ! घुग्गुस रेल्वे सायडिंग मध्ये रंगपंचमीच्या दिवशी आढळला रेल्वेच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन येथून इंजिन आले असल्याने बिबट्या हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील असण्याची शक्यता ! Shocking!  A dead body of a leopard was found on the railway engine on Rangpanchami in Ghuggus railway siding, since the engine came from Chandrapur thermal power station, it is possible that the leopard is from the Tadoba - Andhari tiger reserve !

चंद्रपूर :- मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास घुग्घुस येथील वेकोलि वणी परिसरातील न्यू कोल रेल्वे साइडिंग परिसरात चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्रातून रेल्वे मालगाडीचे इंजिन आले. या मालगाडीच्या इंजिनावर एका बिबट्याचा मृतदेह आढळल्याने घुग्घुस रेल्वे विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेच्या संदर्भात घुग्घुस रेल्वे स्थानकाचे अधिकारी राजेश सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी 6.30 वाजता चंद्रपूर येथील सीएसटीपीएस पॉवर हाऊस येथून मालगाडी आली, त्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह दिसला. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या उच्च दाबाच्या इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात  येऊन सदर बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही शिवाय चंद्रपूरचे सीएसटीपीएस ताडोबाच्या जंगलाला लागून असल्याची माहिती असेल. येथे अनेक प्रकारचे वन्य प्राणी वावरत असतात. सीएसटीपीएस परिसरातही हा बिबट्या घुसला. याआधीही सीएसटीपीएसच्या गर्द जंगलात अनेक वन्य प्राणी दिसले होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)