बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रुळावरून मालगाडी घसरली, दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वेवर प्रभाव (Freight train derails at Ballarshah railway station, affecting southbound trains)
बल्लारपूर :- बल्लारशाह रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वे, दक्षिण पुर्व रेल्वे, व दक्षिण रेल्वे ला जोडणार एक महत्वाचं जंक्शन म्हणुन ओळखलं जात शिवाय महाराष्ट्रातील एक महत्वाचं स्टेशन व दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणुन ही बल्लारशाह रेल्वे स्थानकाला ओळखलं जाते. दक्षिणे कडून येणाऱ्या मालगाडीचा एक डबा बल्लारशाह रेल्वेस्थानकावर रुळावरून खाली उतरल्यामुळे बल्लारशाह रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. यामुळे दक्षिणकडून येणाऱ्या गाड्यांची वाहतूक खोळंबली. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली उघडकीस आली . चारचाकी वाहन वाहून नेणारी ही 25 कोचची मालगाडी दक्षिणकडून दिल्लीला जात होती. ती बल्लारशाह फलाट क्रमांक ५ च्या मागे रेल्वे यार्डमध्ये येताच पोल क्रमांक १२५९ जवळ रेल्वे इंजिनमागील डबा क्रमांक ९५४०२६ हा रुळावरून खाली उतरला. त्यामुळे मालगाडी जाग्यावरच थांबली. ही सूचना बल्लारशाह येथील रेल्वे प्रशासनाला मिळताच सर्व अधिकारी घटनास्थळावर पोहोचून पाहणी केली. या घटनेमुळे दक्षिणकडून येणारी रेल्वे वाहतूक खोळंबली. सदर घटनेची माहिती रेल्वेच्या वरिष्ठांना देण्यात आली असून, हा मार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन कामी लागले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments