जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दर्जेदार मराठी चित्रपटांना बुधवारी 8 मार्च रोजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार अनुदान वाटप (On the occasion of International Women's Day, quality Marathi films will be distributed grants by Culture Minister Sudhir Mungantiwar on Wednesday, March 8.)
मुंबई :- मराठी चित्रपटाना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवार दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात येणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या चित्रपट परीक्षण समितीने यंदाच्या अनुदानासाठी ४१ चित्रपटांना पात्र ठरवले आहे. यातील ०४ चित्रपटांना “अ” दर्जा तर “३३” चित्रपटांना “ब” दर्जा प्राप्त झाला आहे. तर ०४ चित्रपट विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांना शासन धोरणानुसार अ दर्जा देऊन अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनुदानप्राप्त चित्रपटाचा चमू उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाने दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments