शाळा समितीच्या सदस्याची सभा व निरोप समारंभ स्पर्धेत टिकायचे असेल तर जिद्द चिकाटी महत्वाची.- प्रा. महेश पानसे (School committee member's meeting and farewell ceremony, if you want to survive in the competition, persistence is important.- Prof. Mahesh Panse)
मूल :- पालकांना शाळेत सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती व्हावी या उद्देशाने सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल अंतर्गत असलेल्या विविध समित्यांची संयुक्त सभा नुकतीच पार पडली. यात इयत्ता ८ वी विद्यार्थ्याचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या संभारभाच्या अध्यक्षस्थानी शाळा विकास समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोकराव कडुकर, उपाध्यक्ष बंडू घेर, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सुवर्णा पिपरे, समितीचे सदस्य भावना चौखुंडे, ज्योती मोहबे, इंदू मडावी, महेश मेकर्तीवार, निलेश बंडावार, संतोष निकुरे, युनूस खान, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदविधर शिक्षक राजू गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील ८ वर्षाच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रा. महेश पानसे यांनी जुन्या व नवीन शिक्षण पद्धतीवर प्रकाश टाकत स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, चिकाटी व आत्मविश्र्वास महत्वाचा असल्याने शालेय जीवनापासूनच याची मुहूर्तमेढ रोवली गेली पाहिजे असे उदबोधन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. मारोतराव पुल्लावार यांनी विद्यार्थ्यानी शालेय जीवनापासूनच आकलन वृत्ती जोपासण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करुन सतत आपली जिज्ञासावृत्ती जागृत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक अजय राऊत, प्रस्ताविक बंडू अल्लीवार तर उपस्थितांचे आभार रीना मसराम हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक राहुल मुंगमोडे, योगेश पुल्लकवार व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांशी न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments