डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती अधिक गतिमान करण्यासाठी आठ गोल्डन मार्गाचा अवलंब करावा - एस के भंडारे (Dr. Babasaheb Ambedkar's Dhamma revolution should be followed to accelerate the eight golden path - SK Bhandare)
कल्याण -: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून व बौद्ध धर्मांतर करून चातुर्वर्णच्या विषमतेतून, गुलामगिरीतून बाहेर काढले व देशात समता प्रस्थापित केली. त्यामुळे आपण स्वाभिमानी, समतावादी बनून शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळविल्या अधिकार पदे मिळाली, आपली सामाजिक व शैक्षणिक प्रगती व विकास झाला. परंतु समतेचे विरोधक व विषमतेचे पुरस्कर्ते यांना संविधान बदलून धर्मावर आधारित संविधान व राष्ट्र बनवायचे आहे. शिक्षणातील व नोकरीतील आरक्षण संपविण्यात येत आहे, खाजगीकरण व कंत्राटीकरण चालू आहे. मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार इत्यादीमुळे देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे पुन्हा गळ्यात मडके व पाठीला खराटा येऊ शकतो. ज्याप्रमाणे माणसाच्या जीवनात प्रगती होण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 गोल्डन पाथ ऑफ लाइफ त्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती अधिक गतिमान करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष ,समता सैनिक दल ) यांनी आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या ट्रस्टी चेअरमन आद. डॉ हरीश रावलिया व राष्ट्रीय अध्यक्ष आद.चन्द्रबोधि पाटील यांनी संकल्पित केल्यानुसार आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित भारताचा आदर्श नागरिक बनविण्यासाठी काम करणे गरज असल्याचे प्रतिपादन आयु. एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ) यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ठाणे जिल्हाशाखेच्या वतीने नूतन विद्या मंदिर, कल्याण येथे आयोजित केलेल्या भव्य बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक व शिक्षिका मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी केले, आयु एस के भंडारे यांनी पुढे असे सांगितले की, 1) चलो बुद्ध की ओर अभियान, जाती अनंताची चळवळ - धम्म परिषदा, धम्म मेळावे, धर्मांतर - घरवापसी सोहळे, समविचारी बहुजन संघटना /संस्था यांच्याशी संपर्क व समन्वय करणे 2) बुद्धिस्ट आयडेंटिटी निर्माण करणे - केवळ जयभीम वाले अशी न होता संस्कारातून बौद्ध म्हणून ओळख होणे गरजेची आहे. 3) आचारो परमो धम्मो - बौद्ध धम्माचे काटेकोर आचरण करणे 4) टीम वर्क - कार्यकर्ते पदाधिकारी यांनी लिच्छवीचे सात नियम पाळून काम करणे. 5) रोटी बेटी व्यवहार करणे - धर्मांतरित झालेल्या व्यक्ती /समाजाबरोबर रोटी - बेटी व्यवहार करणे आवश्यक आहेत 6) बुद्ध विहार जोडो अभियान राबविणे 7) मंडळ जोडो अभियान - समाजातील युवक, महिला व जयंती मंडळे जोडणे 8) समाजातील डॉक्टर, वकील, नोकरवर्ग, व्यावसायिक जोडो अभियान राबविणे, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्र निर्माण करणे या 8 गोल्डन मार्गाचा अवलंब करावा लागेल. या मेळाव्यात आयु बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव) यांनी बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक - शिक्षिका यांची जबाबदारी व कर्तव्य आयु.अँड एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख) यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करणे ,आयु अशोक केदारे (केंद्रीय कार्यालय राष्ट्रीय सचिव) यांनी बौद्ध धम्माची खास वैशिष्टे आणि आयु भिकाजी कांबळे (अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य) यांनी बौद्ध संस्कार विधी या चार विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच या प्रसंगी आयुनि. सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्षा), आयु. राजेश पवार (राष्ट्रीय सचिव) यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष आयु.विजय गायकवाड हे होते. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस आयु.प्रभाकर सूर्यवंशी यांनी केले. या मेळाव्यात सुरुवातीला समता सैनिक दलाच्या वतीने मेजर विजय गायकवाड यांच्या नेत्रुत्वाखाली मानवंदना देण्यात असली . या वेळी बौद्धाचार्य परीक्षेत पास झालेल्या ठाणे जिल्ह्यातील बौद्धाचार्य यांन प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटण्यात आले. या मेळाव्यास बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक -शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज, मो. 9421717068
Post a Comment
0Comments