आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील बोधी रामटेकेना उच्च शिक्षणासाठी 45 लाखांची शिष्यवृत्ती जाहीर झाली (Bodhi Ramteke, a tribal-dominated Gadchiroli district, announced a scholarship of Rs 45 lakhs for higher education)
गडचिरोली :- आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ॲड. बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण व संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फ़त देण्यात येणारी ‘इरासमूस मुंडस’ ही ४५ लाखांची जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. जगभरातून या शिष्यवृत्तीसाठी केवळ १५ स्कॉलर्सची निवड करण्यात आली. इंग्लंड, स्पेन, नॉर्वे, स्वीडन देशात पुढील दोन वर्षे जगातील विविध चार नामांकित विद्यापीठाच्या संयुक्त अभ्यासक्रमात बोधी कायद्याचे उच्चशिक्षण घेणार आहे. बोधीचे प्राथमिक शिक्षण चामोर्शी व नवोदय विद्यालयात झाले. पुण्यातील आय. एल. एस. विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण घेतांनाच ‘पाथ’ या सामाजिक संस्थेची स्थापना समविचारी मित्र ॲड.दीपक चटप व ॲड.वैष्णव इंगोले यांच्यासोबत करुन राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे काम केले. त्याच्या सामाजिक कामाची विधायक दखल युरोपीय देशांनी घेतली आहे. ‘ह्यूमन राईट्स प्रॅक्टिस अँड पॉलिसी’ या अभ्यासक्रमासाठी स्विडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ गॉथेनबर्ग, स्पेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ देऊस्टो, लंडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ रोहम्पटन, व नार्वे येथील युनिव्हर्सिटी ऑफ ट्रॉमसो या चार देशातील जागतिक विद्यापीठात पुढील दोन वर्षे तो उच्चशिक्षण घेणार आहे. यासाठीच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी युरोपीयन कमीशनने घेतली आहे. अवघ्या २४ वर्षाच्या या तरुणाने वंचित, आदिवासींच्या हक्कांसाठी कायद्याच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामाची दखल युरोपियन देशांनी घेवून शिष्यवृत्ती बहाल केली. आदिवासीबहुल भागातून जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती कर्तृत्वाने मिळवणा-या बोधी रामटेके या तरुण वकीलाने चामोर्शी व गडचिरोली जिल्ह्याची मान उंचावली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा व आई-वडील-मित्रांचे प्रोत्साहन माझ्या वाटचालीत महत्त्वपुर्ण आहे. समाजातील वंचित, आदिवासी समुदायाचे प्रश्न प्रत्यक्ष जमीनीपातळीवर काम करतांना अनुभवले. उच्चशिक्षण घेवून जागतिक स्तरावर येथील प्रश्न मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा, हे प्रत्येक सुशिक्षितांचे स्वप्न असायला हवे. युरोपीयन देशांनी विश्वास दाखवून दिलेली ही संधी पुढील काळात वंचित घटकांसाठी रचनात्मक काम उभे करण्यासाठी बळ देणारे आहे.”
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments