चंद्रपुरातील १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड पाठवणार अयोध्या राम मंदिरासाठी, 29 मार्च रोजी बल्लारशाह वन डेपोतुन निघणार सागवान लाकडाची शोभायात्रा ! (1800 cubic meters of teak wood from Chandrapur will be sent to Ayodhya Ram Temple, a procession of teak wood will leave from Ballarshah Forest Depot on March 29 !)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपुरातील १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड पाठवणार अयोध्या राम मंदिरासाठी, 29 मार्च रोजी बल्लारशाह वन डेपोतुन निघणार सागवान लाकडाची शोभायात्रा ! (1800 cubic meters of teak wood from Chandrapur will be sent to Ayodhya Ram Temple, a procession of teak wood will leave from Ballarshah Forest Depot on March 29 !)

बल्लारपूर :- अयोध्या येथील राम मंदिरासाठी १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात येणार आहे. २९ मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकार मधील तीन कॅबिनेट मंत्री तथा अयोध्या राम मंदिरातील पुजारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजप नेते तथा राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या पूर्वी चंद्रपूरकरांनी मोठया प्रमाणात,अयोध्या मंदिरासाठी रामशिला पाठविल्या होत्या. आता १ कोटी रामनाम जापाचे लिखाण करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी रामभक्तांना हिंदू नववर्षाच्या शुभारंभ प्रसंगी प्राप्त होत आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. या संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. २९ मार्च रोजी सागवान लाकूड ची मिरवणूक बल्लारपूर येथील वन विभागचे डेपोतून निघणार आहे. ही भव्य शोभायात्रा चंद्रपुरात दाखल होऊ. सायंकाळी चांदा क्लब ग्राउंड येथे प्रसिद्ध गायक कैलाश खेर याचे भक्ती संगीतचा कार्यक्रम होईल अशीही माहिती मुनगंटीवार यांनी दिली. भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीणच्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुधवार २२ मार्च रोजी सकाळी गगांधी चौक येथे गुढीपूजन व १ कोटी रामनाम जाप लिखाण पुस्तिकेचे वितरणाची सुरुवात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. रामनाम जापाच्या या पुस्तिका अयोध्या येथील नवनिर्मित राम मंदिरासाठी लोकनेते मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर येथून पाठविण्यात येणाऱ्या काष्ठ (सागवान) पूजन प्रसंगी २९ मार्चला प्रभू श्री रामाला समर्पित केल्या जातील.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)